शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांसह ठाणे जिल्हयातील २९ पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 21:09 IST

कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या मुंब्रा येथील निरीक्षकासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १८ तसेच ठाणे ग्रामीणच्या ११ अशा २९ पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह १ मे रोजी जाहीर झाले आहे. या सर्वांना येत्या काही दिवसांमध्ये ही सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाच्या नऊ जणांचा समावेशठाणे ग्रामीणच्या उपअधीक्षकांसह ११ पोलिसांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह सलग १५ वर्षे सेवेत उत्तम कामगिरी बजावणा-या १८ तर ठाणे ग्रामीणच्या ११ पोलिसांना शुक्रवारी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे. यामध्ये कोरोनावर यशस्वी मात करणाºया मुंब्रा येथील निरीक्षकासह गुन्हे अन्वेषण विभागातील नऊ पोलिसांचा समावेश आहे. या सर्वांना येत्या काही दिवसांमध्ये ही सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.दरवर्षी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत असते. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री हे ही सन्मानचिन्हे प्रदान करीत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १८ जणांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते तर ग्रामीणच्या ११ जणांना पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते ही सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस दलात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणा-या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय २ चे उपायुक्त प्रशांत मोहिते यांना २०१९ या वर्षासाठी हे सन्मानचिन्ह बहाल केले जाणार आहे. याशिवाय, सलग १५ वर्षे प्रशंसनीय उल्लेखनीय कामगिरी करणा-या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील नऊ जणांची या पदाकासाठी निवड झाली आहे. यामध्ये ठाणे शहर युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वागळे इस्टेट युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस आयुक्त कार्यालयातील वाचक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय घोसाळकर, पोलीस हवालदार एस. आर. जाधव, हवालदार गणेश भोसले (भिवंडी), संजय माळी (उल्हासनगर), अंकुष भोसले (खंडणी विरोधी पथक), रविंद्र पाटील (युनिट-१), आणि नितीन ओवळेकर (खंडणी विरोधी पथक) आदींचा समावेश आहे. याशिवाय, नुकतीच कोरोनावर मात करुन रुग्णालयातून परतलेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रशेख यादव, जमादार दत्ताराम पालांडे (वाहतूक शाखा), पोलीस हवालदार प्रियंका काते (कोपरी), विना अपघात उत्तम वाहन चालविणारे हवालदार नुरु खान, पोलीस नाईक निसार पिंजारी (बाजारपेठ), नरेंद्र बागुल (मानपाडा) आणि क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य दाखविणाºया मुख्यालयातील पोलीस शिपाई अरुणा सावंत यांचाही यात समावेश आहे.याशिवाय, ठाणे ग्रामीणमधील भार्इंदरचे उपअधीक्षक शशिकांत भोसले, मुरबाडचे उपअधीक्षक बसवराज शिवपुजे तसेच उपनिरीक्षक नवनाथ कवडे, जमादार गुरुनाथ गोसावी, पोलीस हवालदार सुनिल देटके, अनिल शिलवंत, मच्छिंद्र पंडित, दत्तात्रय गाढवे, सरीता धनावडे, शरयू हिंदूराव आणि कमलाकर चासकर आदी ११ जणांचाही यात समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस