शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात आता थेट ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 23:30 IST

परदेशात जाण्यापूर्वी लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे शहरातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांना आता प्राधान्याने लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून (३१ मे ) वॉक इन पद्धतीने लसीकरणास सुरु वात होणार आहे.

ठळक मुद्देलसीकरणाचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: परदेशात जाण्यापूर्वी लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे शहरातून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांना आता प्राधान्याने लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात सोमवारपासून (३१ मे ) वॉक इन पद्धतीने लसीकरणास सुरु वात होणार आहे. तरी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया शहरातील विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, यासाठी त्यांना प्राधान्याने लसीकरण सुविधा देण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केल्याच्या तसेच महापौर म्हस्के यांनीही यासंदर्भात पत्र दिले होते, त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी परदेशी जाणाºया ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना वॉक इन पद्धतीने लस देण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या परदेशात जात असताना लस घेणे बंधनकारक केले असून ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला आहे, त्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ही थेट लसीकरण सुविधा सकाळी ११ ते २ या वेळेत उपलब्ध केली आहे. ठाण्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य त्या पुराव्यानिशी म्हणजे परदेशात प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून लस देण्यात येणार आहे.सोमवारी प्रथम ५० विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते २ या वेळेत लस देण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार लसीकरणाचे वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे. तरी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यtmcठाणे महापालिका