शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

सी लिंकवरून थेट गाठा पुणे; वाहतूक होणार सुसाट, ९४७ कोटी २५ लाखांचा येणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:11 IST

वाहतूक होणार सुसाट : ९४७ कोटी २५ लाखांचा येणार खर्च

- नारायण जाधव ठाणे : मुंबई ते पुणे प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. वरळीहून निघाल्यावर शिवडी-न्हावाशेवा सी लिंक अर्थात सागरी सेतूवरून थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू ९४७ कोटी २५ लाख खर्चून आता द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही ९४७ कोटी २५ लाखांची कामे दोन टप्प्यात करण्यात येणार आहेत. 

यातील पहिला टप्पा चिर्ले येथील  आंतरबदल व सेवा रस्त्यावर ८५ कोटी ५० लाख खर्चाचा आहे. तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई पारबंदर प्रकल्प थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास विविध कामे करून जोडण्यात येणार असून यावर ८६१ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात ३० हेक्टर जमीन भूसंपादनासाठीच्या १५० काेटी रुपयांचाही  समावेश आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम चार पॅकेजमध्ये सुरू असून १७,८४३ कोटींच्या खर्चास ३ जून २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे.  

  1. पोरबंदर प्रकल्पाला चिर्ले येथून राज्य महामार्ग क्रमांक १०४ ला जोडण्यासाठी दीड किमीचा ३ बाय ३ मार्गिकेचा नवीन रस्ता तयार करणार.
  2. राज्य महामार्ग क्रमांक १०४ हा चिरनेर ते गवाणपाडा असा २ बाय २ मार्गिकेचा असून तो पुढे पनवेल नजीक राष्ट्रीय महामार्ग ३४८ ला जोडलेला आहे. तो आता ४ बाय ४ मार्गिकेचा करण्यात येणार आहे. 
  3. पोरबंदर प्रकल्पावरून ये-जा करणारी वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरून राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे पुढे अडीच किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जोडली जाते. हे रस्ते सध्या २ बाय २ असून ते आता ४ बाय ४ मार्गिकेचे करण्यात येणार आहेत. 
  4. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक या मार्गावर वळविण्यासाठी काेण येथे आंतरबदल बांधून  वाहतूक विनाअडथळा सुसाट करण्यात येणार आहे. 
  5. चिर्ले येथील आंतरबदलामध्ये चार लूप आणि सेवा रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. त्यानुसार  पॅकेज ३ मध्ये  दोन लुपच्या कामांचा समावेश आहे; मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी उर्वरित दोन लूप आणि सेवा रस्ता बांधण्यात येणार आहे.
टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गthaneठाणेPuneपुणे