शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे एसटीस्थानकातून अपहरण करून प्रवाशास लुबाडणाऱ्या पोलीस हवालदारासह दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:22 IST

ठाणे एसटी थांब्यासमोरील सार्वजनिक स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी आलेल्या ४२ वर्षीय प्रवाशाचे अपहरण करुन लुबाडणा-या ठाणे रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरेसह दोघांना ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगृहरक्षक दलाच्या जवानाचाही समावेशसार्वजनिक शौचालयातून केले अपहरण

ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकासमोरील एसटीस्थानकातील शौचालयातून एका प्रवाशाचे गुरुवारी दुपारी अपहरण करून त्याच्याकडून १० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा ३५ हजारांचा ऐवज लुबाडणा-या रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरे आणि होमगार्ड भूषण मोरे या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.हा प्रवासी ठाणे एसटीस्थानकातील सार्वजनिक शौचालयामध्ये ४ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास लघुशंकेसाठी आला. त्यावेळी भूषण मोरे या गृहरक्षक दलाच्या जवानाने तू माझ्या गुप्तांगाला हात लावला, असा आरोप त्याच्यावर केला. त्यानंतर, हा प्रकार बाहेर सांगण्याची धमकीही त्याला दिली. त्यानंतर, नागरे या हवालदारासह दोघांनीही त्याला कळवा रेल्वेस्थानकाबाहेरील चौकीत नेले. तिथे त्याला शिवीगाळ, मारहाण करून त्याच्याकडून १५ हजारांची २५० मिलिग्रॅम एक आणि १० हजारांची दुसरी अशा दोन सोनसाखळ्या तसेच १० हजारांची रोकड असा ऐवज हिसकावला. दुपारी २ ते ४ असा दोन तास हा प्रकार सुरू होता. आपला कोणताही दोष नसताना नाहक पोलिसांनीच लूटमार केल्याचे या प्रवाशाने नातेवाइकांना सांगितले. हा प्रकार समजताच त्यांनी पुन्हा कळवा स्थानकातील चौकी गाठून तिथे ही तक्रार दिली. तेथील रेल्वे पोलिसांनी या दोघांनाही पकडून ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडून १५ हजारांची एक सोनसाखळी आणि सहा हजारांची रोकड असा २१ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले......................सोनाराने दागिने घेतलेच नाहीया प्रवाशाकडील दागिन्यांची लूटमार केल्यानंतर नागरे आणि मोरे या दोघांनीही बाजारपेठेतील एका सराफाकडे हे दागिने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काहीतरी शंका आल्यामुळे त्याने ते घेतले नाही. त्यातील एक सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली असून दुस-या सोनसाखळीचाही शोध घेण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण