शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:04 AM

कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे.

- निलेश धोपेश्वरकरठाणे : कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. यामुळे जेव्हा एखादा पुरुष अडचणीत येतो, तेव्हा तो मदत मागण्यासाठी कुणाकडेही जात नाही. जर त्याने मदतीसाठी हात पुढे केला, तर त्याला कमकुवत ठरवले जाते. अशातून त्याला नैराश्य येते आणि तो थेट आत्महत्या करतो. पुरुषांत असे नैराश्य येऊ नये, याकरिता ‘वास्तव’ फाउंडेशन या पुरुषांच्या हक्काकरिता लढणाऱ्या संघटनेच्या पुरुष कार्यकर्त्यांनी गुरुवारी बहिणींना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मी जरी पुरुष असलो तरी संकटकाळी मला मदतीची गरज असताना तू माझ्या मदतीला धावून ये, असे वचन या भावांनी आपल्या बहिणींकडून घेतले.राखीपौर्णिमा हा बहीणभावाच्या पवित्र नात्यातील दिवस. बहीण आपल्या रक्षणासाठी भावाला राखी बांधते व संरक्षण करण्याचे वचन घेते. हीच आजवर चालत आलेली परंपरा आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून वास्तव फाउंडेशन आगळ्यावेगळ्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी करीत आहे. संकटाच्या काळात दुबळे ठरू नये, याकरिता कुणाचीही मदत न घेतल्याने अधिक अडचणीत येऊन पुरुषांनी आत्महत्या करू नये, याकरिता त्यांना मानसिक आधार व बळ मिळावे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.याबाबत, ‘वास्तव’ फाउंडेशनचे संस्थापक अमित देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, साधारण दोन ते तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. बहीण मला आणि मी बहिणीला राखी बांधतो. भावाने बहिणीला राखी बांधण्याबाबत वास्तव फाउंडेशनने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी भावांनी आपल्या बहिणीला राखी बांधून ‘तू माझे संरक्षण करू शकते’, असे वचन तिच्याकडून घेतले. पुरुषांच्या हक्कासाठी लढणाºया देशभरातील ३० संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे सुरू असून तिथे गुरुवारी ४० पुरुषांनी पाच महिलांना राख्या बांधल्या. अधिवेशनात १५० पदाधिकारी सहभागी झाले आहेत.पुरूष एकटा नाही; हे सांगण्यासाठी केले राखीपौर्णिमेचे आयोजनपुरुषांच्या आत्महत्येमागे त्यांचे रक्षण करणारा कुणीच नाही, हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व संकटांचा सामना एकाकी पुरुषानेच करायचा, ही विचारसरणी बदलण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने राखीपौर्णिमा साजरी करायचे ठरवले. पुरुष अडचणीत सापडला तर बहिणीकडे जा, ती नक्कीच मदत करेल, तू स्वत:ला कमकुवत समजू नको, असा संदेश देणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे ते म्हणाले. यातून महिला सक्षम आहेत, हेही सांगितले जाते. पुरुषाला त्रास होतो, तेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ नसते. म्हणूनच, या राखीपौर्णिमेतून पुरुषालाही त्रास होतो, हे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.हे तुझे आहे कर्तव्य : मुळात राखीपौर्णिमा उत्तर भारतातील सण आहे. आता महाराष्ट्रातही तो साजरा होऊ लागला आहे. पुरुष असल्याने तू संरक्षण करणे, हे तुझे कर्तव्य आहे, हेच अधोरेखित झाले आहे. पौराणिक काळात ब्राह्मण हे क्षत्रियांना राखी बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे वचन घेत असल्याचे दाखले आहेत, याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनthaneठाणेcultureसांस्कृतिक