शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अत्रे कट्ट्यावर गंध कवितेचेमधून उलगडले आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:45 IST

अत्रे कट्ट्यावर स्वरचित कविता सादर करुन विविध विषयांना हात घालण्यात आला. 

ठळक मुद्देआयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे अत्रे कट्टयावर उलगडले कवितांद्वारेसमाजप्रबोधन करणारे विडंबन काव्य सादरराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता

ठाणे : आपल्या आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे अत्रे कट्टयावर कवितांद्वारे उलगडण्यात आले. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ आयोजित स्वरचित कवितांचा ‘गंध कवितेचे’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम पार पडला.     जीवनात प्रत्येक गोष्टीला एक स्वत:चा रंग आहे. सुखाला जसा रंग आहे तसा दु:खालाही आहे. आशा-निराशा यांनाही रंग आहे. प्रेमाच्या विविधरंगी छटा आपल्याला दिसत असतात. तरी पण आपल्याला, माणसाच्या मनातील हळवा कप्पा अधिक भुलवतो. इतकंच नाही तर निसगार्ची विविध रुपे मानवी व्यक्तीमत्त्वाशी पुर्णतया भिनलेली असतात असे सांगत संगीता कुलकर्णी, प्रसाद भावे आणि स्नेहा शेडगे यांनी ही विविध रुपे आपल्या कवितांद्वारे उलगडली. भावे यांच्या ‘ना भेटी ना गाठी ना फुले ना गजरे’ या कवितेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘आला पहिला पाऊस माझी आठवण काढ’, ‘आज माझे शत्रुही सलगी कराया लागले, काय असते ही अमिरी आता कळाया लागले’, ‘मी तुझा अन तु दुज्याची का असे सांगना’, ‘रंगुनी रंगात तुझीया जाहलो आता पुरा’, ‘आला पहिला पाऊस माझी आठवण काढ’ या कविता सादर केल्या. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निमिर्ती करण्यात आली आहे. त्यांनी ‘मैत्री तुझी नि माझी’, ‘वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी अचानक समोर येते’, ‘जगणं काय जगण्याचं स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही तुझ्याशिवाय’, ‘मिहीत रात्र रंगली कमलपुष्पे फुलली, अबोल प्रित बोलली’, ‘रंग आहे पावसाचा अंग हे भिजणारच आहे’, ‘आयुष्य संदुर असतं, आठवणींना घेऊन बसावं कधी समुद्रकिनाऱ्यावर’ तर शेडगे यांनी ‘तेव्हाही मी आणि माझा देह असतो अलिप्त’, ‘अशीच हवी असते की स्वप्नातील ती?’, ‘मनमनाशी घालत असे सांगड अन सांजवेळी होत असे मनी हुरहुर’, ‘ओसाड रानांत नदीच्या गावात विहीरीने घेतलाय पाण्याचा धसका’ या कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. शेवटी आजच्या कलयुगात प्रदुषण आणि प्लास्टीक हे दोन राक्षस असल्याचे सांगत भावे यांनी समाजप्रबोधन करणारे ‘ये प्लास्टीक की चीजे, वो बोतल ही ठहरी पोल्युटेड हवा’ हे विडंबन काव्य सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.  

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई