शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकरमधून इंधन गळती; डिझेल पळवण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 20:07 IST

गळतीमुळे रस्त्यावर सांडणारे डिझल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना गावाच्या हद्दीत सागर हॉटेल समोर शनिवारी दुपारी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकर मधून डिझेलची गळती सुरु झाली होती. टँकर मधून  गळतीमुळे रस्त्यावर सांडणारे डिझल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. बादल्या, डबे आणि मिळेल त्या साधनातून सांडणारे डिझल साठवण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती.हे पाहता १९९३ वर्षापूर्वी अश्याच एका घटनेत मेंढवन खिंडीत आगीचा भडका उडून ११३ लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याने त्याच घटनेची पुनरावृत्ती होते की काय?अशी भीती व्यक्त केली जात होती.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डिझेल वाहतूक टँकरला गळती लागल्यानंतर 28 हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या एका कप्प्यातून डिझलची गळती सुरु झाली होती.सहा हजार लिटर डिझलची गळती झाल्याची माहिती समोर आली आहे.टँकर मधून  गळतीमुळे सांडणारे डिझल भरण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.बदल्या,डबे आणि मिळेल त्या साधनातून सांडणारे डिझल साठवण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती.ग्रामस्थांकडून टँकर मधून सांडणाऱ्या ज्वालाग्राही  डिझलची साठवणूक असुरक्षित पद्धतीने केली जात असल्यामुळे आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. १९९३ वर्षापूर्वी याच मुंबई अहमदाबाद मार्गावर मेंढवन खिंडीत एक टँकर उलटल्या नंतर त्यातून रस्त्यावर पडलेल्या ज्वालाग्रही रसायनाला पेट्रोल डिझेल समजून परिसरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या घरातील भांडी गोळा करून घरात साठा जमवून ठेवला होता ह्यावेळी एका छोट्याश्या आगीने मेंढवण आणि परिसरातील अनेक पाडे आगीत भस्मसात होऊन सुमारे ११३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.त्यामुळे आजच्या घटनेमुळे ह्या घटनेची पुनरावृत्ती होते की काय?अशी स्थिती निर्माण झाली होती. 

टॅग्स :palgharपालघर