शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीपूजेमुळे देशाला हुकूमशाहीचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:07 IST

मोदी सरकारने लोकशाही संस्थांची मोडतोड करायला सुरुवात केली आहे.

कल्याण : मोदी सरकारने लोकशाही संस्थांची मोडतोड करायला सुरुवात केली आहे. भारतीय राजकारणात व्यक्तिपूजेचे स्तोम माजत आहे. अन्य कोणत्याही देशांत ती इतकी दिसून येत नाही. व्यक्तिपूजेमुळे अध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा धोका निर्माण होतो. त्याचा प्रतिकार करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. संविधान टिकले तरच आपण टिकू, असे प्रतिपादन संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक व विचारवंत निरंजन पाटील यांनी रविवारी येथे केले.शहराच्या पश्चिम भागातील वालधुनी, अशोकनगरमधील बुद्धभूमी फाउंडेशन येथे ‘प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी’तर्फे एकदिवसीय ‘संविधान साहित्य संमेलन’ रविवारी झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. प्रा. दामोदर मोरे, डी.एल. कांबळे, चंद्रशेखर भारती, एस.एन. भालेराव, सर्वेश्वर काणेकर, डॉ. सुषमा बसवंत, अण्णा रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केले.पाटील म्हणाले की, राजकीय पक्षांनी पक्ष आणि जातीला अधिक महत्त्व दिले, तर लोकशाहीव्यवस्था धोक्यात येईल, असे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. सध्या आपला देश याच परिस्थितीतून चालला आहे. देशाची सत्ता संविधानाचे शत्रू असलेल्यांच्या हाती गेली आहे. त्यामुळे भारतात अदृश्य स्वरूपात आणीबाणीची स्थिती आहे. त्यासाठी संविधानाचे रक्षण केले पाहिजे. आपल्या देशात कोणी काय खावे, काय बोलू नये, काय लिहावे, काय लिहू नये, अशा प्रकारची अघोषित सेन्सॉरशिप लागू झाली आाहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती धोक्यात आली आहे. जे लिहितात, बोलतात, त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्यांना ठार मारले जात आहे. संविधान आणि देश वाचविण्यासाठी लेखकांनी जागे होऊन त्यावर आपल्या लेखणीने प्रहार केला पाहिजे. सरकारच्या विरोधात आपल्या लेखणीचे हत्यार उपसले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. संविधानाला आपण वाचविले नाही, तर आपल्याला कोणी वाचविणार नाही, याकडे पुन्हा एकदा पाटील यांनी लक्ष वेधले.संमेलनाचे प्रास्ताविक डी.एल. कांबळे यांनी केले. ते म्हणाले की, सम्राट अशोक याने त्याच्या काळात सर्व प्रकारच्या प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर बंदी घातली होती. अशोक राजाच्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय होता. मात्र, स्वतंत्र भारतात ब्राह्मणी संस्कृतीला राजाश्रय मिळत असून बौद्ध संस्कृती परकी ठरली आहे. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, याकडे लक्ष वेधले. प्रा. मोरे यांनी सांगितले की, भंडारा जिल्ह्यात दरवर्षी संविधान संमेलन भरविले जाते. त्याच धर्तीवर कल्याणमध्ये पहिल्यांदाच संविधान संमेलन भरविले गेले, ही बाब कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे.।उद्घाटन दीड तास उशिरानेया संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार होते. तसेच संमेलनास आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार होेते. हे दोन्ही मान्यवर न आल्याने संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष निरंजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने उद्घाटन झाले.