शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील तरुणी ठाण्यात सापडली, जागरूक नागरिक व पोलिसांच्या मदतीने महिला दिनीच स्वगृही परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 03:57 IST

मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर एकाच ठिकाणी तिने तंबू ठोकल्याचे पाहून एका जागरूक नागरिकाच्या मदतीने पोलिसांनी तिचे समुपदेशन करून महिलादिनी तिला स्वगृही पाठवले.

- पंकज रोडेकरठाणे  - मातृछत्र आधीचेच हरपले, वडील दारूच्या अधीन गेले. विवाह झाल्यापासून दोन्ही मोठ्या भावांनीही कौटुंबिक जबाबदारीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धुळ्याच्या एका तरुणीने स्वावलंबी जीवनासाठी मुंबईची वाट धरली. महिलादिनी ठाण्यात दिवसभर एकाच ठिकाणी तिने तंबू ठोकल्याचे पाहून एका जागरूक नागरिकाच्या मदतीने पोलिसांनी तिचे समुपदेशन करून महिलादिनी तिला स्वगृही पाठवले.नंदिता (नाव बदलले आहे) असे त्या तरुणीचे नाव असून ती वडिलांसोबत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. बारावी सायन्सला असलेली नंदिता हिचा २३ फेब्रुवारी रोजी मराठीचा पेपर होता. त्यामुळे पेपरच्या वेळेत ती सायकल घेऊन घरातून निघाली. सायंकाळ झाली तरी, घरी परतली नाही म्हणून तिच्या वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती कुठेच सापडत नसल्याने अखेर त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी देवपूर पोलीस ठाण्यात जाऊन मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पण, घरातून जाताना ती कोणालाही काही सांगून निघाली नसल्याने आणि तिला कोणीही पाहिले नसल्याने तिचा शोध घेणे पोलिसांना कठीण होऊन बसले होते. त्यातच, एकीकडे सर्वत्र ८ मार्च रोजी महिला दिन साजरा होताना ती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आवारात पोलिसांसाठी सुरू केलेल्या ऊर्जिता हॉटेलजवळ येऊन उभी होती. सकाळी आलेली नंदिता सायंकाळ झाली तरी तेथेच घुटमळत असल्याचे विशाल पाटील नामक जागरूक नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजर केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती गप्पच बसली होती. त्यानंतर, तिने पुण्यात राहणाºया भावाचा पत्ता आणि फोन नंबर दिला. तसेच वडील दारूच्या अधीन गेले असून मातृछत्र हरपले आहे. तसेच आपणास दोन भाऊ असून एक पुण्यात तर दुसरा सैन्य दलात असल्याचे सांगितले. त्यातच, स्वावलंबी जीवनासाठी मैत्रिणीसोबत मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. पण, ती येत नसल्याचे लक्षात येताच आपणच धुळ्यावरून ट्रेनने मुंबई गाठली. काही दिवस ब्रह्माकुमारी आश्रमात घालवले. त्यानंतर, ठाण्यातील ऊर्जिता हॉटेलजवळ येऊन थांबल्याचे तिने सांगितले.तिच्या भावाशी संपर्क साधून त्याला तिची माहिती दिली. त्यानुसार, शुक्रवारी तिला तिचे पालक आणि देवपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील व त्यांच्या पथकाच्या स्वाधीन केले. शुक्रवारी ती स्वगृही परतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सांगितले.स्वावलंबी जीवनासाठीनंदिता (नाव बदलले आहे) असे त्या तरुणीचे नाव असून ती वडिलांसोबत धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील दारूच्या अधीन गेले असून मातृछत्र हरपले आहे. तसेच दोन भाऊ असून एक पुण्यात तर दुसरा सैन्य दलात आहे.मात्र, तिला स्वावलंबी जीवन जगायच्या उद्देशाने तिने घर सोडले आणि मुंबईतून ठाण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र