शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 07:18 IST

 ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना किमान सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत.

ठाणे : ‘हम दो शिफ्ट मे काम करते है. पर जो दिन मे काम करता है उसको धूप बहुत लग रही है. आज धूप बहुत हैं, सर पे टोपी भी नही है. सर, धूप से बचने के लिये टोपी तो दिला दो. आप किसी को तो कहो की हमे धूप बहुत लग रही हैं और टोपी चाहिए,’ अशा शब्दांत रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. 

 ठाणेरेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना किमान सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. देशात उष्माघाताने ४१ जणांना मृत्यू झाला असताना व मुंबईत उष्माघाताने तिघांना त्रास झाला असतानाही रेेल्वे प्रशासनाने पुरेशी काळजी घेतलेली नाही.मध्य रेल्वेच्या ६३ तासांच्या मेगाब्लॉकचा शनिवारी दुसरा दिवस होता. एकीकडे प्रवाशांची गर्दी, गोंधळ होता. गाड्या उशिराने धावत होत्या, तर दुसरीकडे मेगाब्लॉकमध्ये करण्यात येणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामगारांची तारेवरची कसरत चालू होती. 

५०० कामगारांचे राबले हात     सकाळी ८ वाजल्यापासून काम केल्यावर दुपारी भूक लागलेल्या कामगारांनी १ वाजण्याच्या सुमारास जेवण घेतले.      कामाचा ताण घालवण्यासाठी थोडा आराम केला. कोणी प्लॅटफॉर्मवर झोपले. कोणी पेवर ब्लॉकवरती पाठ टेकली. जिथे जागा मिळेल, तिथे आराम करत होते. कोणी मोबाइल वरती आपले मनोरंजन करून घेत होते.     सुमारे ५०० कामगार या कामांमध्ये गुंतल्याची माहिती स्टेशन मास्तर किशोर तावडे यांनी दिली. हे कामगार उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल येथून आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

 रात्री ज्यांना काम करण्यासाठी आम्ही टोपी देतो, त्यांनी ती टोपी ठेवून जायचे असते. मात्र, ते घेऊन गेले. त्यामुळे या लोकांना आम्ही टोपी कुठून देणार, असे उत्तर कंत्राटदारांनी दिले. 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे