शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
2
ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...
3
"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"
4
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!
5
सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
6
झुनझुनवालांचा फेव्हरिट स्टॉक बनला रॉकेट, बिजनेस अपडेटनंतर आली तुफान तेजी; तुमच्याकडे आहे का हा शेअर
7
मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?
8
हिंदू प्रियकरासोबत लग्न करत शबनमची बनली शिवानी; २ पती, ३ पोटच्या मुलांनाही सोडलं
9
पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी : कंगना
10
एक महिना मैदा न खाल्ल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल; आजच करा सुरुवात
11
मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार कुटुंब; ५०००० कोटींच्या भूमिचे मालक; तुमच्या घरातही मिळतील यांच्या वस्तू
12
Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा!
13
पत्नीच्या कॅन्सरबाबत कळताच अशी झालेली आयुषमान खुराणाची अवस्था, म्हणाला- "मी हॉस्पिटलमध्ये खांबाच्या मागे बसून..."
14
Sonu Sood : "जर सीट बेल्ट नसेल तर..."; पत्नीच्या अपघातानंतर १२ दिवसांनी सोनू सूदने जनतेला केलं 'हे' आवाहन
15
सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री
16
"तू एक काम कर..."; मरणाच्या दारातून परतलेल्या रिषभ पंतला आशिष नेहराने दिलेला मोलाचा सल्ला
17
जयपूरमध्ये व्यावसायिकाने ९ जणांना चिरडले; दारू पिऊन पळवली ७ किमी गाडी, पोलिसांच्या गाड्याही सोडल्या नाही
18
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन!
19
जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी
20
धक्कादायक! आणखी १५ वर्षं खेळायचं होतं पण..., क्रिकेटपटूने २७ व्या वर्षीच स्वीकारली निवृत्ती

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश

By अजित मांडके | Updated: July 3, 2024 18:30 IST

मंगळवारी आयुक्त राव यांनी बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली.

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून बाळकूम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे ही १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करुन तरणतलाव १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी झालेल्या पाहणीऱ्यादरम्यान दिले.

मंगळवारी आयुक्त राव यांनी बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली. बाळकूम, कोलशेत आदी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. सदर तरणतलाव अद्याप नागरिकांसाठी खुला झाला नसल्याने तो लवकर खुला करावी अशी मागणी सातत्याने परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या तरणतलावाची पाहणी करुन कामाचा आढावा घेत या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळमजला अधिक चार मजल्याची ही इमारत असून इमारतीच्या लिफ्टचे काम हे सप्टेंबरपर्यत पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात आले. परंतु तत्पूर्वी तरणतलावाची सर्व कामे पूर्ण करुन सदर तरणतलाव १५ ऑगस्ट रोजी नागरिकांसाठी खुला करावा असेही आयुक्तांनी नमूद केले. 

या ठिकाणी लहान मुलांसाठी बेबी पूलची मागणीही नागरिकांकडून होत असल्याचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आवश्यक बदल करुन मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियमची पाहणी ही आयुक्तांनी केली. या स्टेडियमध्ये असलेल्या बॅडमिंटन कोर्टच्या छताचे वॉटरप्रुफींगचे काम तातडीने करण्यात यावे., तसेच इमारतीला लावण्यात आलेल्या टाईल्स या उखडलेल्या अवस्थेत असून त्याची दुरुस्ती करावी, तसेच ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणची दुरूस्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय आदींची देखील पाहणी करण्यात आली.  घोडबंदर परिसरातील कलरकेम येथे महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडाची पाहणीही यावेळी करण्यात आली. घोडबंदर परिसरात नागरिकांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नसून याबाबत नागरिक वारंवार मागणी करत असल्याचे माजी नगरसेविका उषा भोईर यांनी नमूद केले. या सुविधा भूखंडावर क्रिकेटचे मैदान तयार केल्यास याचा फायदा परिसरातील मुलांना निश्चितच होईल. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करुन निर्णय घेवू असे आयुक्तांनी नमूद केले. तसेच बाळकूम येथे असलेल्या कलाभवनची पाहणी आपण केली असून कलाभवन दुरूस्ती करुन ते लवकरच कलाप्रेमींसाठी खुले होईल या दृष्टीने कार्यवाही करणार असल्याचेही राव यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे