शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डीजी सिटीच्या ठेकेदारावर साडेअकरा कोटींची मेहरबानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 01:27 IST

ठाणे महापालिकेचे डीजी सिटी अ‍ॅप पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेचे डीजी सिटी अ‍ॅप पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये त्याचे ठेकेदार ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ यांची मुदत संपुष्टात येणार होती. मात्र, त्याआधीच नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्याला पुन्हा पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.विशेष म्हणजे पहिल्या वर्षात पाच लाख वर्गणीदारांचे टार्गेट असताना आणि दुसऱ्या वर्षातही संबंधित ठेकेदार लक्ष्यापर्यंत पोहोचला नसताना दोन वर्षांसाठी ११ कोटी ५२ लाखांच्या प्रस्तावाला काही सदस्यांचा विरोध असतानाही मंजुरी दिली आहे. यामुळे या कंत्राटातील ‘बेरी’ खाणारे ‘कोल्हे’ कोण याच्या शोधासाठी या ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’च्या कंत्राटाची चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.महापालिकेच्या डीजी सिटी अ‍ॅपचा शुभारंभ २३ जानेवारी २०१८ रोजी मोठ्या जोशात केला होता. पहिल्या सहा महिन्यांतच पाच लाखांचे उद्दिष्ट गाठावे, असे निश्चित झाले होते. परंतु, पहिल्या सहा महिन्यांत केवळ ४२ हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले. त्यातही त्याद्वारे मालमत्ताकर भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाईल, असे पालिकेने जाहीर केले होते. परंतु, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नसतानासुद्धा संबधित‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ला पालिकेने कालावधी संपण्यापूर्वीच ११ कोटींचे बिल अदा केले होते. त्यामुळे हा वाद चांगलाच उफाळून आला होता.>काम पूर्ण नसताना ११ कोटींचे बिलदेशातील पहिला प्रकल्प म्हणून येत्या १० जानेवारी रोजी डीजी सिटीचा सन्मान करण्यात येणार आहे. असे जरी असले तरी आता पुन्हा हे अ‍ॅप वादात सापडण्याची चिन्हे आहेत. आधीच काम पूर्ण केले नसताना ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ला ११ कोटींचे बिल अदा केल्याचा वाद पेटला होता. त्यानंतर, आता पुन्हा काही दिवसांपूर्वी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्यांना पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव आयत्या वेळी मंजूर केला आहे. मुळात ‘फॉक्सबेरी टेक्नोलॉजी’ला दिलेला कालावधी हा येत्या आॅगस्टमध्ये संपणार होता. परंतु, सहा ते सात महिने आधीच त्यांना ११.५२ कोटीच्या कंत्राटाची ची मुदतवाढ का दिली, असा सवाल करण्यात येत आहे.>शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही प्रस्तावांची मुदतवाढ संपून सहा महिने ते एक वर्ष होते, सुरक्षारक्षकांच्याही मुदतवाढीचा प्रस्ताव हा मुदत संपल्यानंतरही तीन ते चार महिन्यांनी पालिका मंजुरीसाठी आणत असते. असे असतानाही महत्त्वाच्या किंबहुना अत्यावश्यक असलेल्या कामांना मुदतवाढ न देता डीजी सिटीसाठी एवढी लगीनघाई कशासाठी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.>अवघ्या दोन लाख ठाणेकरांनीचकेली नोंदणीठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास असताना आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार लोकांनी या अ‍ॅपचा फायदा घेतल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर, ६५० व्यापाऱ्यांनी यासाठी नोंदणी केली असून त्यानुसार एक हजाराहून अधिकच्या डिस्काउंट स्कीम या अ‍ॅपवर नोंदणी करणाºयांना मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे अ‍ॅप सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत किमान पाच लाखांच्या आसपास नागरिकांनी ते डाउनलोड करणे अपेक्षित होते. परंतु, तसे काही झालेले नसून आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले आहे.