शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ठाण्यातून हरवलेली देवकी अखेर सापडली, आॅपरेशन मुस्कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:53 IST

ठाणे : आईवडील नसल्याने लहान वयात मामीने देवकीचे (नाव बदलले आहे) जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला. पण, ते न ...

ठाणे : आईवडील नसल्याने लहान वयात मामीने देवकीचे (नाव बदलले आहे) जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला. पण, ते न करण्यासाठी तिने जीव देणार असल्याचे नमूद करून घर सोडले. परंतु, शास्त्रीनगर येथून हरवलेली सतरावर्षीय देवकी तब्बल चार वर्षांनी टिटवाळा येथे वास्तव्यास असल्याचे ‘आॅपरेशन मुस्कान’ या मोहिमेंतर्गत ठाणे शहर पोलिसांनी शोधून काढले. तिने वर्षभरापूर्वीच शाळा सोडल्याचा दाखला काढण्याने ती जिवंत असल्याचा पुरावा मिळाल्यावर पोलिसांनी तिच्या शाळकरी मित्रमंडळींच्या फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास १५० ते २०० ग्रुपची तपासणी करून अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी ठरले आहेत.शास्त्रीनगर येथे मामीसोबत राहणाऱ्या देवकीचे वडील ती लहान असताना सोडून गेले होते. तर, २००९ मध्ये तिच्या आईच्या निधनानंतर ती मामामामीकडे राहण्यास आली. याचदरम्यान, ती १७ वर्षांची असताना तिच्या मामीने तिच्या लग्नाचा जबरदस्तीने घाट घातला. मात्र, लग्न करायचे नसल्याने तिने २६ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी मामी मॉर्निंग वॉकला गेली असताना घर सोडले. जाताना तिने एक चिठ्ठी मामीसाठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये मी कोणाबरोबर पळून जात नाही. तसेच मला शोधू नका. मी काही दिवसांत जीव देणार आहे, असे नमूद केले. याप्रकरणी देवकीच्या मामीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी तिला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षाने तो ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग झाला. याचा तपास सुरू असताना एक वर्षांपूर्वी देवकीने शाळा सोडल्याचा दाखला काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली.त्यामुळे ती जिवंत असल्याचा पहिला पुरावा मिळाला. त्यानुसार, दौंडकर यांच्या पथकाने तिच्या मित्रमंडळी, नातेवाइकांशी संपर्क साधला. याचदरम्यान, तिच्या जवळच्या मित्रमंडळींच्या फेसबुकवर तिचा शोध घेऊन जवळपास १०० ते १५० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची तपासणी केली. त्यामध्ये एका ग्रुपमध्ये तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी दिसून आली.ती ज्याच्या संपर्कात होती, त्याची विचारपूस केल्यावर त्याने तिला पैशांची मदत केल्याचे पुढे आले. त्यानुसार, तिचे बँक खाते मिळून आल्यावर तिचा दुसरा नंबर पुढे आला. मात्र, तो नंबरही तिसºयाच्या नावाचा होता. त्याचा शोध घेतल्यावर अखेर गुरुवारी ठाणे शहर पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. यावेळी तिने दिलेल्या माहितीवरून जबरदस्तीने लग्नाचा घाट घातल्याने पळून गेल्याचे सांगितले.लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार : घर सोडल्यावर काही दिवस महिला सुधारगृहात राहिली. त्यानंतर, दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, एका कंपनीत कामाला लागली. सध्या ती टिटवाळा येथे राहत आहे. तसेच त्याच कंपनीतील एकाने तिला लग्नाची मागणी घातली असून लवकरच ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस