शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी

By धीरज परब | Updated: March 11, 2023 22:46 IST

सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

मीरारोड- मीरा भाईंदर मधील एका बड्या विकासकास ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांच्या खंडणी साठी धमकावत विविध मार्गाने त्रास देणाऱ्या तिघांवर काशीमीरा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा शुक्रवार १० मार्च रोजी दाखल केला आहे. 

विकासक आनंद अग्रवाल, हरीश उर्फ मोंटू अग्रवाल व जॉर्डन परेरा या तिघांची भागीदारीतील ए कॉर्प नावाची बांधकाम व्यवसायाची कंपनी आहे. सदर तिघा विकासकांना काशीमीरा भागातील जमीन प्रकरणी ईडी ने नोटीस पाठवली असून ईडीने त्यांची चौकशी सुरु केल्याचे भाईंदर मधील इस्टेट एजंट गौतम अग्रवाल रा . सोरेटो , कंट्री क्लब समोर , अंधेरी याच्या कडून सांगितले जात होते . तर मितेश शाह  रा . एसेन रियालिटी , डीमार्ट जवळ , भाईंदर याने सदर विकासकांना त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या नावे ईडीच्या दिल्ली कार्यालयाची व सत्येंद्र माथुरिया ह्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेली चौकशीची नोटीस दाखवली होती . मितेश याने विकासकांना सांगितले कि , गौतम अग्रवालचे ६ कोटी ५० लाख व मला ५ लाख द्या तर माथुरिया साहेबांना सांगून तुम्हाला ईडीची क्लीन चिट मिळवून देतो. 

दुसरीकडे विकासक राजू शाह रा . हमिरमल टॉवर , भाईंदर पश्चिम  हे देखील ती कथित ईडीची नोटीस पालिका आयुक्तां पासून संबंधित पालिका अधिकाऱ्यांना पाठवून आनंद अग्रवालच्या बांधकाम प्रकल्पा विरुद्ध तक्रारी करत होते . आनंद अग्रवाल व त्यांच्या भागीदारांना मात्र ईडी कडून तशी कोणतीच नोटीस मिळालेली नसल्याने त्यांना संशय आला . त्या ईडी नोटीसचा अर्धवट फोटो मितेश याने  एकाच्या मोबाईल द्वारे अग्रवाल यांना पाठवला . त्यांनी सदर प्रकरणी ईडी कार्यालया कडे ऑक्टोबर २०२२ मध्ये त्या कथित नोटीस बाबत विचारणा केली.  ईडी कार्यालयाने अग्रवाल यांना ईमेल द्वारे अशी कोणतीच नोटीस बजावलेली नसून ती फेक असल्याचे कळवले. 

गौतम व राजू यांनी ईडीची ती बनावट नोटीस मार्फत विविध मार्गाने बदनामी चालवली होती. त्यामुळे आनंद यांनी जानेवारी महिन्यात पुन्हा ईडी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्या कार्यालयाने पुन्हा अशी कोणतीच नोटीस बजावली नसून तुम्ही पोलीस ठाण्यात बोगस  नोटीस प्रकरणी फिर्याद देऊ शकता असे कळवले. त्यामेलच्या आधारे आनंद अग्रवाल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. भाईंदर पोलिसांनी चौकशी केली असता ईडीची तशी कोणतीच नोटीस नसल्याचे आढळून आले. आनंद अग्रवाल यांचा तक्रार अर्ज काशीमीरा पोलिसां कडे वर्ग केल्या नंतर पोलिसांनी गौतम अग्रवाल, मितेश शाह व राजू शाह विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम हे तपास करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिसfraudधोकेबाजी