शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत रस्त्यांवर टीएमटीचे मार्ग निश्चित करा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:34 IST

Thane News : ठाणे परिवहनचा गाडा पुन्हा रुळांंवरून खाली उतरल्याने तिला पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी परिवहन समितीने २०० बसची मागणी महापौरांकडे केली आहे.

ठाणे - ठाणे परिवहनचा गाडा पुन्हा रुळांंवरून खाली उतरल्याने तिला पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी परिवहन समितीने २०० बसची मागणी महापौरांकडे केली आहे. तसेच परिवहनला सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. या संदर्भात गुरुवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात एक बैठक झाली. या बैठकीत ठाणेकरांच्या सोयीसाठी गेली अनेक वर्षे परिवहन सेवा कार्यरत आहे. ही सेवा अधिक सक्षमतेने नागरिकांना उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले. परिवहन सेवा ही मुख्य रस्त्यापर्यंत मर्यादित न ठेवता ती शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील धावली पाहिजे, या दृष्टीने नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, परिवहन समितीचे सर्व सदस्य, परिवहन उपायुक्त संदीप माळवी व इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. यापूर्वीच पालकमंत्री एकनाथ शिंदे व महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांना १०० इलेक्ट्रिक बस ठाणेे महापालिकेला द्याव्यात, या मागणीचे निवेदन दिले असल्याचे सांगून या संदर्भात पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापौर यांनी यावेळी  नमूद केले.

उत्पन्नवाढीच्या दृष्टीने नियोजन गरजेचेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात ते आठ महिने परिवहन सेवा ठप्प होती. याचा आर्थिक फटका बसत आहे. परिवहन सेवा सक्षम करताना उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टीनेदेखील योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्षांमध्ये ठाण्याचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत असून मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. केवळ मुख्य रस्त्यांबरोबरच शहरातील अंतर्गत रस्तयांवर बससेवा उपलब्ध होईल, या दृष्टीने सर्व मार्गांचे फेरीनियोजन वा फेररचना करणे आवश्यक आहे. छोट्या रस्त्यांवर सेवा देण्यासाठी लहान बस परिवहनच्या ताफ्यात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे