मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात झालेल्या उपचाराचा तपशील मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला़ रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने हा ६० पानी तपशील न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर सादर केला़ जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी हा तपशील वाचायचा असल्याचे न्यायालयाला सांगितले़ त्यास न्यायालयाने संमती दिली़ यावरील पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे़ त्यात बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांची साक्ष होऊ शकते. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून उद्धव व जयदेव यांच्यात वाद सुरू आहे़ या मृत्युपत्राच्या वैधतेवरच जयदेव यांनी आक्षेप घेतला आहे़ या वादावर सामोपचाराने तोडगा काढावा, अशी सूचना न्यायालयाने ठाकरे बंधूंना केली होती़ यासाठी जयदेव यांनी तयारी दर्शवली़ उद्धव यांनी यास नकार दिला़ (प्रतिनिधी)
बाळासाहेबांच्या उपचाराचा तपशील हायकोर्टात सादर
By admin | Updated: January 21, 2015 01:22 IST