शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट निम्मं असुनही भार्इंदर - ठाणे शिवशाहीला प्रतिसाद कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:08 IST

एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत.

मीरारोड - एसटीने सुरु केलेल्या भार्इंदर - ठाणे या वातानुकुलीत शिवशाही बसला प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश बस ह्या निम्म्या रीकामीच जात आहेत. तर बसच्या १० ते १२ फेरया रद्द कराव्या लागत आहेत. मधले प्रवाशी न घेणे, मधले थांबे नसणे, वाहक नसणे या मुळे तिकीट दर कमी असुन देखील प्रवाशी मिळत नसल्याची कारणं समोर आली आहेत.एसटी महामंडळाने ठाणे - भार्इंदर - ठाणे अशी शिवशाही वातानुकुलीत बस ११ फेब्रुवारी पासुन सुरु केलेली आहे. भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर एसटी बस स्थानक असुन येथुन ठाणे एसटी स्थानकसाठी बस सुटतात. या बसचे भार्इंदर - ठाणे भाडे अवघे ४८ रुपये इतके आहे. परंतु सदर बस मध्ये वाहक नसुन भार्इंदर वरुन ठाणे असे तिकीट बस मध्ये बसण्या आधीच घ्यावे लागते. सदर बस ही कापुरबावडी, माजीवडा , कोर्टनाका या तीनच ठिकाणी उतरणारया प्रवाशांसाठी थांबते. वाहकच नसल्याने मधुन प्रवाशी घेतले जात नाहीत.एसटीच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवशाहीच्या ८ बस या मार्गावर देण्यात आल्या असुन एका बसच्या तीन फेरया या प्रमाणे रोज २४ फेरया व्हायला हव्या. पण प्रत्यक्षात मात्र रोजच्या जेमतेम १२ ते १५ फेरयाच होत आहे. त्यातच शिवशाही ही भार्इंदर वरुन सुटली की थेट कापुरबावडी, माजीवडा, कोर्ट नाका व ठाणे स्थानक येथेच थांबते. त्यामुळे भार्इंदर पश्चिम पासुन काशिमीरा नाका पर्यंत चढणारे मोठ्या संख्येने असलेले प्रवाशीच बसला मिळत नाहीत. तशीच गत पुढे देखील होते. बसला मध्ये थांबे नसल्याने वाहक दिलेली नाही.परिणामी सकाळी गर्दीच्या वेळात दोन - चार बसच पुर्ण भरुन सुटतात. तेही बस भरण्यासाठी एसटी कर्मचारी प्रवाशांना आग्रह करताना दिसतात. नंतरच्या बस मध्ये जेमतेम २० - २५ प्रवाशीच मिळतात. बस भरे पर्यंत बराच वेळ जात असल्याने बहुतांश प्रवाशी आपला लालडबाच बरा म्हणतात.वास्तविक साध्या एसटी बस वाटेतली स्थानकं घेत ठाण्याला जात असल्याने या बसना नेहमी गर्दी असते. एसटीचा हा फायद्यात चालणारा बस मार्ग मानला जातो.भार्इंदर स्थानक बाहेरुन एमबीएमटीच्या देखील ठाणे कोपरीर् साठी बस सुटतात. यात साध्या तसेच वॉल्वो बसचा समावेश आहे. भार्इंदर ठाणे मार्गेवर पालिकेच्या फक्त दोन वॉल्वो बस धावत असुन त्यांच्या साधारण ८ फेरया होतात. पालिकेच्या सदर वॉल्वोचे तिकीट हे १०० रुपये इतकं आहे. पण ही बस देखील प्रमुख थांबे घेत जाते. एसटीच्या शिवशाहीचे दर पालिका बस पेक्षा निम्मे असले तरी अजुन तरी प्रवाशी वा उत्पन्नावर परिणाम झाला नसल्याचे एमबीएमटीच्या सुत्रांनी सांगीतले.