शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुपस्थित असूनही डॉक्टरची सही : चक्क रूग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:19 IST

डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चालत असल्याचे उघड झाले आहे.

मीरा रोड : डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चालत असल्याचे उघड झाले आहे. गंभीर बाब म्हणजे डॉक्टर रजेवर असतानाही त्या दिवशी ते हजर असल्याची स्वाक्षरी करून पगार लाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.भार्इंदर पूर्वेला पालिकेच्या नवघर शाळेतील आरोग्य केंद्रात डॉ. बी. डी. चकोर यांची नियुक्ती झाली आहे. या केंद्रात तपासणी व उपचारासाठी सुमारे शंभरच्या घरात रूग्ण रोज येतात. ७ फेब्रुवारीला डॉ. चकोर हे रजेवर होते. पण डॉ. रजेवर असताना त्या ठिकाणी अन्य पर्यायी डॉक्टर दिला जात नसल्याने औषध निर्माण अधिकारी स्वप्नील देव हेच चक्क डॉक्टरांच्या खुर्चीत बसून रुग्णांना आजारपणाबद्दल विचारुन औषध देत होते. त्यांना डॉक्टर कुठे आहेत या बद्दल विचारले असता ते व्यक्तीगत कारणांनी रजेवर असल्याचे सांगत होते.प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनाही डॉ. चकोर उपस्थित नसल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी देखील ते व्यक्तीगत कारणांनी रजेवर असल्याचे सांंगितले.एकीकडे पालिकेच्या आरोग्य केंद्रात येणाºया गोरगरीब गरजू रुग्णांना तपासण्यासाठी पर्यायी डॉक्टर नाही. त्यातही डॉक्टरांच्या गैरहजेरीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांना औषधे देत आहेत. बहुतांश आरोग्य केंद्रां मध्ये देखील स्थिती वेगळी नाही.याआधी पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात देखील डॉक्टर जागेवर नसल्याने वेळीच उपचाराअभावी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. डॉक्टर जागेवर नसताना पर्यायी व्यवस्था न देतानाच आरोग्य केंद्र चालवली जात आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाºया नगरिकांना जीव धोक्यात घालूनच उपचार घ्यावे लागतात.एकीकडे डॉक्टर रजेवर असताना त्यांच्या हजेरी पुस्तिकेत चक्क ते हजर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रातील हजेरी पत्रकात आपला खाडा दाखवल्यास पगार चुकेल म्हणून ही शक्कल लढवली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेतील बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये असाच प्रकार चालत असून कुणाला कुणाचा मागमूस राहिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.कारवाईकडे लक्ष -आरोग्य केंद्रात अशी परिस्थीती असल्याने तेथे येणाºया रूग्णांची हेळसांड होते.या संदर्भात पालिका आयुक्त बी.जी.पवार कुठली कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या बाहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये हे असलेच प्रकार सुरू आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. बेजबाबदार अधिकारी फुकटचा पगार लाटण्यासाठी कामावर हजर नसताना हजेरीपत्रकावर सहया करतात. सखोल चौकशी करुन कारवाई आवश्यक आहे.- सुलतान पटेल, अध्यक्ष, जगदंब प्रतिष्ठान

टॅग्स :doctorडॉक्टरMira Bhayanderमीरा-भाईंदर