शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आता म्हाडाप्रमाणेच सिडकोचीही परवडणारी घरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:53 IST

या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे : म्हाडा सर्वसामान्यांना परवडणारी घरे तयार करते. परंतु, सिडकोची घरे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सिडकोच्या घरांसाठी अर्ज करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागतो. परंतु, आता म्हाडाप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परडवतील अशी घरे उभारण्यात येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आलेल्या म्हाडाच्या कोकण विभागीय घरांच्या सोडतीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न साकार करणे हे आमचे ध्येय आहे. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर जनतेच्या विश्वासाची शिदोरी असल्याचेही ते म्हणाले. 

पारदर्शक पद्धतीने कामया सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले.  घर म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या आत्मसन्मानाचा पाया आहे. म्हणूनच  पारदर्शक पद्धतीने घर वाटप केले जात असल्याचेही शिंदे म्हणाले. पूर्वी काही विकासकांनी प्रकल्प रखडवून ठेवले होते, मात्र आता तीन वर्षांचे भाडे आगाऊ देण्याची अट घालूनच विकासकांना कामे दिली जाणार आहेत. त्यामुळे वेळेत प्रकल्प पूर्ण होऊन घर वाटप होईल आणि घराचे स्वप्नही साकार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : CIDCO to offer affordable homes like MHADA, says Shinde.

Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde announced CIDCO will build affordable homes, similar to MHADA. Speaking at a MHADA event, he emphasized transparency in housing allocation and timely project completion, aiming to fulfill the common man's dream of owning a home. Over 1.84 lakh applications were received for 5,354 houses.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाmhadaम्हाडा लॉटरीcidcoसिडको लॉटरी