शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मंदी, दर्जाहीन अभ्यासक्रमामुळे अभियंते ‘दीन’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:52 AM

आपल्या मुलांनी अभियंता किंवा डॉक्टर बनावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते.

- स्वप्नील पेडणेकरठाणे : आपल्या मुलांनी अभियंता किंवा डॉक्टर बनावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी मग ऐपत नसताना लाखोंची कर्जे घेऊन त्याची फी भरली जाते. याचाच फायदा घेऊन इंजिनीअरिंग कॉलेजचे सर्वत्र पीक आले आहे. संस्थाचालकांनी स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी पदव्या वाटण्याचा अक्षरश: धंदा सुरू केला आहे. मात्र, बाजारात त्यांचे मूल्य शून्य होत असल्याने बेरोजगार अभियंत्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. एकीकडे स्किल इंडिया, मेक इन इंडियासारख्या या योजना राबवत असताना अभियंत्यांवर ओढवलेली ही स्थिती चिंताजनक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अनेकांवर पडेल ती कामे करण्याची वेळ ओढवली आहे.एका सर्वेक्षणानुसार, दरवर्षी हजारो नवे अभियंते तयार होत आहेत. त्यातील सुमारे ८० टक्के बेरोजगार आहेत. अभियंत्यांच्या पदासाठी जागा निघाल्या, तर एका जागेसाठी ३०० अर्ज येतात. यामध्ये प्रतिष्ठित संस्थांतील पदवीधरांनाच संधी मिळत असल्याने इतरांच्या वाट्याला निराशा येत आहे. त्यातच, अर्थव्यवस्थाही गेल्या काही वर्षांपासून अनिश्चित वातावरणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडमोडींबाबत संवेदनशील असलेली निर्यात आणि सेवाक्षेत्रांची कामगिरी डळमळीत सुरू आहे. आयटी क्षेत्राचे अर्थकारण ज्या अमेरिका आणि युरोपशी जोडलेले आहे, त्या देशांनाही मंदीची झळ सहन करावी लागत आहे. तसेच, अमेरिकेत स्थलांतराविषयीचे कायदे कडक करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संकट ओढवले आहे. आॅटोमोबाइल उद्योगाचीही अवस्था बिकट झाली आहे. गेल्या सहासात महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री घसरत आहे. परिणामी, उत्पादन घटवावे लागत असल्यामुळे नोकऱ्यांवरही गदा आली आहे. बांधकाम क्षेत्राचीही तीच स्थिती आहे. या सर्वच बाबींचा फटका इतरांबरोबर अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधारकांनाही बसत आहे.स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि रोजगारांविषयी चर्चा करताना अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात नोकरी मिळवताना झगडावे लागत आहे. लाखो रुपयांची फी भरूनही दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात तंत्रकौशल्य आणि त्या क्षेत्रातील ज्ञान आवश्यक आहे, मात्र त्याचाच नव्या पदवीधारकांमध्ये अभाव दिसून येतो. या समस्येमुळे संपूर्ण व्यवस्थाच अडचणीत येऊ शकते, असे जेडी इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी संचालक रूपल दलाल यांनी सांगितले.आर्थिक बाबींसोबतच कालबाह्य अभ्यासक्रम, दर्जेदार शिक्षकांची उणीव, आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आणि तंत्रशिक्षणाबाबतच्या धोरणातील त्रुटी यामुळे विविध कॉलेजमधून दर्जाहीन अभियंत्यांची निर्मिती होत आहे. आपल्या ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्षात वापर कसा करावा, हेही अनेकांना उमगत नाही. त्यातच तंत्रज्ञानातील बदलाच्या झपाट्यात जुना अभ्यासक्रम वेगाने मागे पडत आहे. अभियांत्रिकी कॉलेजना वाटलेली परवानगीची खैरात आणि त्यातून निर्माण झालेल्या असंख्य जागा या कशा भरायच्या, याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दरवर्षी ५० टक्के जागा रिक्त राहत असल्यामुळे आर्थिक चणचणीमुळे नवे अभ्यासक्रम, सुविधा देणे जड जात आहे. त्यामुळेच शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.नोकºयाच मिळत नसल्यामुळे अनेकांना आपल्या क्षेत्राबाहेर नोकरी करावी लागत आहे. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे १०-१५ हजारांची नोकरीही ते करत आहेत. काही जणांवर तर मिक्सर, फॅन दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्राकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.>मेकॅनिकलच्या ७२ टक्के, तर सिव्हिलच्या ६७ टक्के जागा रिक्ततंत्रशिक्षण संचालनालयानुसार, राज्यात मेकॅनिकल शाखेच्या एकूण ३३,९०० जागा आहेत. यातील सुमारे ७२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल शाखेत अनुक्रमे ६७ टक्के आणि ६९ टक्के जागा रिक्त आहेत. तर, कॉम्प्युटर शाखेत १७,४९६ जागांपैकी ३३ टक्के जागा रिक्त आहेत.अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने यावर्षी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या एक लाख ६२ हजार जागा रद्द केल्या आहेत. २०१४-१५ मध्ये अभियांत्रिकीच्या जागा १९ लाख एक हजार ५०१ होत्या. त्यात आतापर्यंत चार लाख ३५ हजार ३८७ जागा कमी झाल्या आहेत. उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखेचे पदवीधरही आयटी आणि सेवा क्षेत्राकडे वळत आहेत. आॅटोमेशनमुळे उत्पादन क्षेत्रातील तांत्रिक सुपरवायझर वा अभियंत्यांची गरज कमी झाली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उपलब्ध संधींच्या तुलनेत मनुष्यबळाचा पुरवठा वाढल्याने नोकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने नोकरी मिळणे हे मोठे आव्हान ठरत आहे.>अभियांत्रिकीच्या घसरलेल्या जागांची आकडेवारीवर्ष जागा२०१४-१५ १९,०१,५०१२०१५-१६ १८४४६४२२०१६-१७ १७,५२,२९६२०१७-१८ १६,६२,४८८२०१८-१९ १५,८७,०९७२०१९-२० १४,६६,११४