शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: आनंद मठाजवळ झाले जाेरदार शक्तिप्रदर्शन, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:00 IST

जांभळी नाकापासून टेंभी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी सकाळपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून काही काळ बंद करण्यात आली होती.

ठाणे : शिवसेना किसन नगर शाखेच्या वतीने  एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी सोमवारी ‘चलो आनंद आश्रम’, असे आवाहन केल्याने शेकडो शिंदे समर्थकांनी शक्तिस्थळापाशी शक्तिप्रदर्शन केले. त्या पार्श्वभूमीवर सकाळपासून आनंद आश्रम परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सकाळपासूनच येथे  शिंदे समर्थकांनी जमण्यास सुरुवात केली. शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे आनंद मठात आल्यावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर हे सर्व एकत्र आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर गेले. तेथे शिंदे समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.जांभळी नाकापासून टेंभी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी सकाळपासून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून काही काळ बंद करण्यात आली होती.  प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सोडले तर अन्य कोणालाही या मार्गावर पोलीस सोडत नव्हते.  शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेला आनंद आश्रम ठाण्यातील शिवसेनेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे  स्थान आहे. या आनंद आश्रमातून दिघे न्यायनिवाडा करीत, याच वास्तुतून अनेक महत्त्वाचे राजकीय डावपेच आखले जात होते. शिंदे यांनी केलेल्या बंडाला समर्थन दर्शवण्यासाठी सोमवारी सकाळपासून शिंदेसमर्थक, ज्येष्ठ शिवसैनिक यांनी आनंद आश्रमात गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, हेमंत पवार, माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, मीनाक्षी शिंदे यांसह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे