शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिम मतदारसंघाची शिवसैनिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 01:43 IST

गुरुपौर्णिमेला पालकमंत्र्यांकडे धरला हट्ट : खा. पाटील यांना जागेच्या बोलीवर मदत केल्याची करुन दिली आठवण

अनिकेत घमंडी डोंबिवली : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा देताना कल्याण पश्चिमेची विधानसभेची जागा भाजपने शिवसेनेला सोडावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आता तो मतदारसंघ सेनेकडे मागून घेण्याची मागणी कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने भेट घेतली तेव्हा केली. कल्याण पश्चिमेतून भाजपचे नरेंद्र पवार हे मागीलवेळी विजयी झाल्याने या जागेवरुन युतीत तणाव होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यावर नाराज होते. विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी त्यावेळी पाटील यांच्याकडे केली होती. पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी असतानाही शिवसैनिकांनी त्यांना मदत केली होती. त्यामुळे आता कल्याण पश्चिमची जागा आम्हाला दिल्याचे जाहीर करावे, असा हट्ट कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी शिंदे यांच्याकडे धरला. त्यामुळे आम्ही शब्द पाळला, आता भाजपनेही तो पाळावा अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांच्याकडे जागेची मागणी केल्याची माहिती शिवसैनिक व माजी नगरसेवक रवी पाटील यांनी दिली. कल्याण पश्चिमेमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये ३८ पैकी २४ नगरसेवक शिवसेना व पुरस्कृत अपक्ष विजयी झाले. उर्वरित ५ भाजपचे आणि ४ मनसेचे नगरसेवक विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती नसल्याने शिवसेनेकडून विजय साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मोदी लाटेत भाजपचे नरेंद्र पवार निवडून आले. आता युतीमध्ये निवडणूक लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य असलेली जागा शिवसेनेला सोडावी, अशी शिवसैनिकांची भावना असल्याचे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत खा. पाटील यांच्या प्रचारसभेतच शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या भूमिकेमुळे युतीत आलबेल नाही हेच स्पष्ट झाले आहे.

ठाण्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ भाजपचे संदीप लेले मागत आहेत, अंबरनाथची डॉ. बालाजी किणीकर, तसेच कल्याण ग्रामीणचीही शिवसेनेची जागा भाजप कार्यकर्ते मागत आहेत. निवडणुका जवळ आल्या की अशा मागण्या होतातच. युतीचे वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आपल्याला मान्य असेल. - नरेंद्र पवार, आमदार

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाkalyan-west-acकल्याण पश्चिम