शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सहा हजार दावे प्रलंबित, न्यायप्राधिकरणाचे बेंच वाढवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:25 AM

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

- मुरलीधर भवारकल्याण : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, रेल्वे अपघात दावा न्यायप्राधिकरणाचे एकच बेंच असून त्यांच्याकडे पाच वर्षांतील सहा हजार दावे प्रलंबित आहेत. भरपाईची रक्कम वाढवली असली तरी दावे फेटाळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान, न्यायप्राधिकरणाचे बेंच वाढवल्यास दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढू शकते.मध्य व पश्चिम मार्गावरील उपनगरी लोकलने दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेवरील पाच व सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. ते २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कल्याण येथे टर्मिनस नसल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे उपनगरी गाड्यांचा खोळंबा होतो. लोकलच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत. लोकलना सकाळ व सायंकाळी प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागतो. त्यामुळे उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज किमान पाच तर कमाल १५ अपघात होतात. त्यात प्रवासी जखमी होतात, तर बहुतांशी त्यांचा मृत्यू होतो. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना यापूर्वी चार लाख रुपयांची भरपाई दिली जात होती.रेल्वे अपघात दावा न्यायप्राधिकरण मुंबई येथे आहे. या प्राधिकरणाकडून दावा निकाली लागल्यानंतर मदत दिली जाते. मात्र, ही मदत अपुरी आहे. रेल्वे व्यवस्थापकला काही वर्षांपूर्वी २५ हजार रुपये पगार होता. आता तो दोन लाखांच्या घरात गेला आहे. महागाई वाढली आहे. हा रेष लक्षात घेता अपघातात मृत्यू होणाºया प्रवाशांच्या भरपाईच्या रक्कमेत १० लाखांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केली होती. प्रशासनाने महासंघाची मागणी विचारात घेता भरपाईची रक्कम चार लाखांवरून आठ लाखांपर्यंत वाढवली. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून सुरू केली आहे.न्याय प्राधिकरणाकडे जानेवारी २०१२ ते २०१७ या कालावधीतील अपघात झालेल्यांचे सहा हजार भरपाईचे दावे आहेत. ते आता सुनावणीसाठी बोर्डावर येणे सुरू झाले आहेत. सुनावणीनंतर दावे निकाली निघण्याचे प्रमाण महिन्याला ३० ते ४० इतकेच आहे.महिन्याला किमान ३० दावे निकाली निघाले तर वर्षाला ३६० दावे निकाली निघतात. या वरून सहा हजार दावे निकाली निघण्यासाठी १७ वर्षे लागू शकतात. भरपाईची रक्कम दुप्पट झाली असली तरी दावे किरकोळ कारणाने फेटाळण्याचे प्रमाण वाढले आहे.दरम्यान, अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांतच भरपाईची रक्कम मिळाली तर त्यांना आधार मिळू शकतो. दावे निकाली निघण्यास पाच ते सहा वर्षे लागत असतील तर, त्यांना मिळालेल्या मदतीचा काहीच उपयोग होत नाही. अनेकदा दावा दाखल करणारी व्यक्तीही पाठपुरावा सोडून देते.>खासदारांनी लक्ष घालणे आवश्यकन्यायप्राधिकरणाच्या बेंचकडे मुंबई, मनमाड आणि पुणे परिसरातील रेल्वे अपघातांत मृत्यू झालेल्यांचे दावे सुनावणीसाठी येतात. त्यामुळे बेंचवर कामाचा ताण आहे. बेंचची संख्या तीनपर्यंत वाढवल्यास मुंबई, मनमाड आणि पुणे यांना स्वतंत्र बेंच मिळेल. दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढेल, याकडे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने लक्ष वेधले आहे. खासदारांनी ही मागणी उचलून धरल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जाऊ शकते.