शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोनचाफ्याला मागणी वाढली, गणेशोत्सवात शेतकऱ्याला सोनेरी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 19:52 IST

गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत.

अनिरुद्ध पाटीलडहाणू - गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत. त्यांच्या बागेत दोन हजार झाडे असून त्यांना महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात या शेतकऱ्यास सोन्याचे दिन आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सन 2011 साली चुरी यांनी 1500 रोपांची लागवड, साडेपाच एकर जागेत केली होती. लागवडीनंतर दोन वर्षात उत्पन्न निघायला सुरुवात झाली. 25 ते 30 वर्षापर्यंत हे झाड उत्पन्न देते. आजतागायत झाडांची संख्या 2 हजार असून दररोर वीसहजार फुले निघतात. सध्या प्रतिशेकडा शंभर ते सव्वाशे रुपये बाजारभाव आहे. ऋतुमानानुसार फुलं निघण्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी, दिवसागणिक सरासरी वीस हजार फुले, याप्रमाणे वर्षभर फुलं निघतात. दरम्यान, जमिनीची मशागत, खत, मजुरी व अन्य खर्च वगळता वर्षाला 6 ते 7 लक्ष रुपये उत्पन्न मिळत असल्याचे विशाल चुरी यांचे म्हणणे आहे."या रोपांना रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, तसेच गांडूळ खताचा वापर केल्याने उत्पन्न चांगले व दर्जेदार निघते. कमीत-कमी रासायनिक कीटक नाशाकांचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या हंगामात इतर ठिकाणी उत्पन्न कमी असते. त्यावेळी येथे झाडं बहरलेली असतात. तर ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी व खत व्यवस्थापन करता येते, असे शेतकरी बबन चुरी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरीGanpati Festivalगणेशोत्सव