शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी; ड्रायव्हिंग स्कूलची वाहनेही रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:51 IST

रिक्षा युनियनचा आक्षेप

डोंबिवली : रस्त्यावरील बेवारस वाहनांवर तातडीने कारवाई करावी आणि वाहतूककोंडीतून पश्चिमेकडील नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी रिक्षा-चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी केली. पश्चिमेला स्थानक परिसरात कशाही रिक्षा उभ्या असतात, याबद्दल जागरूक नागरिकांनी वाहतूक विभागाला तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत युनियनने भंगार वाहनांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

जोशी यांनी सांगितले की, स्थानक परिसरात असो अथवा पश्चिमेला पूर्वेकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात टोइंगची कारवाई वाहतूक विभाग करते, त्या तुलनेने पश्चिमेला होत नाही. त्यामुळे वाहनचालक ठिकठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन करताना आढळतात. दुतर्फा वाहने उभी केली जात असल्यामुळे समस्येत भर पडते.

दीनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक परिसरात कोंडी असते. घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी चौक, महात्मा फुले रस्त्यावर कोल्हापुरे चौकातही वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे. सुभाष रस्ताही अरुंद असल्याने नवापाडा ते कुंभारखाणपाडा भागात कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाची इच्छाशक्ती नसल्याने समस्या जटिल बनत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाची कारवाई सुरूच असते, पण कोपर पूल बंद केल्याने पश्चिमेला कारवाई करण्यासाठी जाताना अडथळे येत असल्याचे सांगितले. मात्र, या अडथळ्यांनंतरही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तरीही कुठे वाहने उभी करत असतील, तर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.नियमांचे होतेय उल्लंघनशहरातील अनेक ड्रायव्हिंग स्कूलची वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. पार्किंग सुविधा असेल तरच ड्रायव्हिंग स्कूलसाठी परवानगी देण्यात येते. मात्र, या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यासाठी वाहतूक विभाग असो की, आरटीओ अधिकारी असोत, या सर्वांनी तातडीने पाहणी करून समस्या मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणे