शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात महिलेची प्रसूती; दोघेही सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 23:02 IST

टिटवाळा येथून रुग्णालयात निघालेल्या इर्शात शेख (21) या महिलेला लोकलमध्ये प्रसूतीच्या वेदना होण्यास सुरूवात झाल्या.

ठाणे: टिटवाळा येथून रुग्णालयात निघालेल्या इर्शात शेख (21) या महिलेला लोकलमध्ये प्रसूतीच्या वेदना होण्यास सुरुवात झाल्या. त्या महिलेला ठाणे रेल्वे स्थानकात उतरून तिची ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात सुखरूप प्रसूती केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शेख या महिलेला मुलगा झाला असून ते दोघेही सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली.टिटवाळा येथील रहिवासी असलेली इर्शात ही महिला कुटुंबीयांसह रुग्णालयात प्रसूतीसाठी टिटवाळा अप जलद लोकलने सायन रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. डोंबिवली सोडल्यानंतर तिला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. याचदरम्यान, आरपीएफ हेल्पलाईनवरून ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयात त्याबाबत माहिती मिळाली. तात्काळ, उपप्रबंधक आर. के. दिवाकर, काटेवाला मनीषा पाटले यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस वर्षा मदणे यांच्यासह फलाट क्रमांक 6 वर धाव घेतली. ती लोकल सायंकाळी 6.15 वाजता फलाटाला लागताच, त्या महिलेला स्टेजरवरून ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात (वन रूपी क्लिनीक) उपचारार्थ दाखल केले.तेथे सहा वाजून 35 मिनिटांनी त्या महिलेची प्रथमोपचार केंद्रातील डॉक्टर राठोड, लतिका कोतवाल आणि परिचारिका कोमल आणि भावना यांनी तिची सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर त्या दोघांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. प्रथमोपचार केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत ही तिसरी सुखरूप प्रसूती असल्याची माहिती प्रथमोपचार केंद्राचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.