शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवा - मनविसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:28 IST

घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर होत असलेल्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी मनविसेने केली आहे.

ठळक मुद्देअनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मनविसेची मागणी आमच्या स्टाईलने ही समस्या सोडविली जाईल - मनविसेया वाहतूक कोंडीचा त्रास सामान्यांना

ठाणे: घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर अनधिकृत वाहन पार्किंगच्या विळख्यात हा रस्ता अडकला आहे. महापालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखेने हा रस्ता पार्किंगमुक्त न केल्यास आमच्या स्टाईलने ही समस्या सोडविली जाईल असा इशारा मनविसेने दिला आहे.        घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल्स, शोरुम, मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहन पार्किंग केली जाते. आता हळूहळू फेरीवाले देखील ठाण मांडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. या समस्येकडे मात्र महानगरपालिका आणि त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष असून या बेशिस्त वाहन पार्किंगवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक कोंडीचा त्रास समान्यांनी का सहन करायचा? सर्व्हिस रस्ता हॉटेल्स, शोरुम आणि मॉलसाठीच आहे का? या बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न मनसेने उपस्थित केले आहे. या अनधिकृत पार्किंगवर कारवाई व्हावी आणि हा रस्ता पार्किंगमुक्त व्हावा अन्यथा मनविसे आंदोलनाचा बडगा उचलेल असा इशारा ठाणे उपशहर अध्यक्ष किरण पाटील यांनी दिला आहे. २०१५ साली हा प्रश्न मनविसेने उपस्थित केला होता. त्यानंतर कारवाईचा दिखावा करण्यात आला. आता परिस्थिती जैसे थे आहे असे पाटील यांनी सांगितले. कापुरबावडी ते ओवळा पर्यंत असलेला सर्व्हिस रोड हा अनधिकृत पार्किंगचा अड्डाच बनला आहे असा आरोप मनविसेने केला आहे. संध्याकाळी या रस्त्यावरुन जाणे कठिण आहे. त्यामुळे ही पार्किंग ताबडतोब हटविण्याची मागणी मनविसेने केली आहे. मंगळवारी या संदर्भात मानपाडा प्रभाग समिती आणि वाहतूक नियंत्रण शाखेला मनविसेने निवेदन दिले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेTrafficवाहतूक कोंडी