शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांवरील कारवाईस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:31 IST

जि.प.विरोधात शिक्षकांमध्ये संताप। न्यायालयात जाण्याच्या तयारीत

ठाणे : सोयीच्या बदलीसाठी चुकीची व खोटी माहिती देऊन तसेच बनावट वैद्यकीय दाखले जोडून फसवणूक करणाºया ६८ शिक्षकांवर अद्यापही जिल्हा परिषदेने कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. या शिक्षकांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांच्याकडून लेखी खुलासे मागितले होते. त्यानंतर, बहुतांश सर्वच शिक्षकांनी खुलासे केलेले असतानाही त्यातील दोषींवर प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्याने अन्यायग्रस्त इतर शिक्षक पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्या काही महिन्यांपूर्वी झाल्या. त्या करताना संबंधित कागदपत्रांची, शाळेच्या अंतराची व अन्यही माहितीची कोणत्याही प्रकारे शहानिशा केल्या गेल्या. त्यात सोयीची शाळा प्राप्त करून घेण्यासाठी काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली असतानाच अन्य पात्र शिक्षकांवर अन्याय केला. संवर्ग १ व २ आणि अवघड क्षेत्र म्हणजे आदिवासी, दुर्गम भागात काम केलेले नसतानाही काही शिक्षकांनी काम केल्याची खोटी माहिती देऊन जवळच्या व शहरालगतच्या शाळांचा लाभ घेतला. शिक्षण विभागाने अजूनही संवर्ग १ व अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तर अजूनही तपासणी व चौकशी झालेली नसल्यामुळेही शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रशासनाकडून ‘अर्थ’पूर्ण पाठराखणसंवर्ग १ व अवघड क्षेत्रातील शाळांच्या अंतराची तपासणी होण्याऐवजी केवळ बदलीसाठी बनावट दाखले दिल्याच्या सर्टिफिकेटनुसार जिल्हा परिषदेने ६८ शिक्षकांच्या नावाची यादी तयार केल्याचे शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या शिक्षकांचा खुलासा व दाखले तपासणीच्या दृष्टीने जमा झाले आहेत.ते बनावट असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित आहे. मात्र, त्यास विलंब झाल्यामुळे अन्यायग्रस्त शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ जून २०१८ च्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहितीही शिक्षकांकडून स्पष्ट केली जात आहे. परंतु, त्यास बगल देऊन ‘अर्थ’पूर्ण कामकाजाद्वारे कारवाईस पात्र ठरणाºया शिक्षकांची पाठराखण केल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.प्रशासन म्हणते कारवाई नक्कीच होणारचुकीचे, खोटे व बनावट दाखले दिलेल्या शिक्षकांचे निलंबन निश्चितपणे होणार असल्याची ग्वाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. परंतु, प्रशासनाची फसवणूक करणाºया या शिक्षकांवर जीआरनुसार एक वेतन कायमचे रोखण्याच्या कारवाईसह या त्यांनी ज्या पात्र शिक्षकास विस्थापित केले आहे, त्या शिक्षकास मूळ जागी पुनर्पदस्थापना देऊन बनावटगिरी करणाºयास अन्यायग्रस्त शिक्षकांच्या जागी बदली करण्याची अपेक्षा अन्यायग्रस्तांनी केली आहे. यामुळे भविष्यात अशा बनावटगिरीस आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे