शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेला हात जोडण्याची शस्त्रक्रिया अयशस्वी, पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 23:04 IST

घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नसल्याचे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले.

ठाणे: घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नसल्याचे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. अर्चनाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. याप्रकरणी सोसायटीच्या पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी कोणालाही अटक केलेली नाही.कासारवडवलीतील बोरींडापाडा येथे वास्तव्याला असलेली ही मुलगी ‘उन्नती ग्रीन’ या इमारतीमध्ये तिस-या मजल्यावर शिकवणीला जात होती. तीन दिवसांपूर्वी ती शिकवणीसाठी दुपारच्या वेळी गेली. त्यावेळी तळमजल्यावर पडलेले आपले पेन घेण्यासाठी ती लिफ्टने खाली आली. लिफ्टमधून बाहेर पडताना तिची चप्पल लिफ्टमध्येच राहिली. चप्पल काढण्याच्या प्रयत्नात अर्चना असतानाच लिफ्ट अचानक सुरु झाली. लिफ्टच्या दरवाजात तिचा डावा हात अडकला. तो कोपरापासून तुटल्याने तिला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असली तरी हात जोडण्यासाठी तिच्यावर केलेली शस्त्रक्रिया मात्र अयशस्वी ठरली. दरम्यान, याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार या पदाधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ८ ते १० जणांचे जबाब नोंदवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले. पदाधिका-यांबरोबर, मुलीचीही काही अशी चूक असून ग्रीलचा दरवाजा या घटनेला कारणीभूत असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा