शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; लोकशाहीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:06 IST

"हीच बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची शिवसेना असल्यावरही शिक्कामोर्तब"

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोकशाहीमध्ये मेरिटला महत्त्व असते. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचे बहुमत असल्याचे स्पष्ट झाल्यानेच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच खरी शिवसेना ही आमचीच असल्याचे स्पष्ट झाले असून हीच बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची शिवसेना असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी तोफ डागली. शिंदे म्हणाले की, निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध झाले असून विरोधकांना चपराक बसली आहे. आता पक्ष चालविताना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी कोणालाही करता येणार नाही. लोकशाहीत निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन करायचे, असे करता येणार नाही.

काँग्रेसला डोक्यावर बसवले

बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र, त्यांनी काँग्रेसला डोक्यावर बसवले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांचे विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल ही मोठी चपराक असल्याचेही शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.

विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करणार

भरत गोगवले आमचे प्रतोद असून ते वैध असल्यावर शिक्कामोर्तब झाले. ठाकरे गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावे ते देऊ शकले नाहीत. ठाकरे गटाचे आमदार अपात्र करावे ही याचिका गोगावले यांनी अध्यक्षांकडे केली होती. मात्र, ती का फेटाळण्यात आली याची कारणे आम्हाला माहीत नाहीत. विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवली

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पक्षाचा कारभार घटनेनुसार चालत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मनमानी कारभार करून स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवली, असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितले होते. मात्र, त्यांनी स्वत:चे नाव दिले, त्यावरुन त्यांनी टोला लगावला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना