शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 कोरोनाच्या संसर्गामुळे दिड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:22 IST

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली.

मीरारोड - कोरोनाच्या संसर्गा मुळे यंदा दिड दिवसांच्या गणेश मुर्त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे . त्यातच बहुतांश भाविकांनी मातीच्या पर्यावरणपूरक मुर्त्या आणत घरात वा परिसरातच कृत्रिम तलाव करून मुर्त्या विसर्जन केल्या आहेत . कारण गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसांच्या विसर्जन केलेल्या घरगुती गणेश मुर्त्यांची संख्या ९ हजार ३८१ इतकी होती . यंदा मात्र दीड दिवसांच्या ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच विसर्जना साठी महापालिकेच्या मूर्ती स्वीकृती केंद्र व विसर्जन ठिकाणी आल्या. 

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली. मिरवणुका आदी सर्व बंद केल्याने यंदा कुठेही रस्ते जाम झालेले नव्हते . बहुतांश भाविकांनी जागरूकता दाखवत मातीच्या लहान मुर्त्या आणल्या . विसर्जन देखील घरातच करण्याचे प्रमाण यंदा वाढले . महत्वाचे म्हणजे अनेक मंडळ , शिवसेना आदींच्या वतीने स्वतःच पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव निर्माण केले होते . त्यामुळे अनेकांनी आपल्या परिसरातील या कृत्रिम तलावांना पसंती दिली.

गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसाच्या  ९ हजार ३८१ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र शहरात पालिका विसर्जन स्थळी  दीड दिवसांच्या केवळ ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच आल्याची माहिती पालिकेने दिली आहे . 

सार्वजनिक मंडळांनी देखील कोरोना संसर्गा मुळे जबाबदारीची भूमिका घेतली आहे . गेल्या वर्षी दिड दिवसांच्या २९ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र १६४ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन झालेले आहे . यातून अनेक सार्वजनिक मंडळांनी देखील दिड दिवसांचाच गणपती ठेवला होता .  मंडळांनी लहान मंडप , कमी आकाराची मूर्ती आणि साधा देखावा अशी सामंजस्याची भूमिका घेतली .  काही मंडळांनी तर परिसरातच कृत्रिम तलाव उभारून त्यात मूर्ती विसर्जन केली .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरGanesh Mahotsavगणेशोत्सव