शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

श्रमजीवीच्या मागण्यांवर डिसेंबरपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:19 IST

श्रमजीवी संघटनेच्या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला बोलावून २२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

ठाणे : श्रमजीवी संघटनेच्या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला बोलावून २२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील पाठपुराव्यासाठी प्रधान सचिव भूषण गगराणी यांची नोडल आॅफिसर म्हणून नियुक्ती केली आहे.अडीच तासांपेक्षा जास्त वेळ झालेल्या चर्चेनंतर मध्यरात्री ठाणे-मुलुंडच्या वेशीवर थांबलेल्या आदिवासीबांधवांनी एकच जल्लोष केल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा माजी आमदार विवेक पंडित यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पंडित म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे ३५३ कलम अजामीनपात्र करून भाजपा सरकारने आदिवासींच्या कैवाºयाची नव्हे, तर मारेकºयाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे सरकार ब्रिटिशांपेक्षा वाईट आहे. ब्रिटिशांच्या काळात ते कलम जामीनपात्र होते. तो गुन्हा जामीनपात्र ठेवावा, अशी मागणी केली आहे.त्यामध्ये बदल करावा, अन्यथा पुन्हा स्वातंत्र्यासाठी आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे. शासनाने श्रमजीवी संघटनेला आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी पालघर, रायगड, नाशिक तसेच ठाण्यातील हजारो आदिवासी आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई चेकनाक्यावर वस्तीसाठी राहिलेल्या आदिवासींनी मंगळवारी चुली, धान्य, भांडी, सरपण आदी साहित्य आणून तेथेच ५०० चुली पेटवल्या होत्या. तेथे तंबू ठोकल्यानंतर रात्री मुख्यमंत्र्यांचा चर्चेसाठी निरोप आला.या चर्चेसाठी प्रधान सचिव, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे पालघर-जिल्हाधिकारी, महिला बालकल्याण आणि आरोग्य विभागाचे सचिव आदी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मुद्यांवर चर्चा केली. यामध्ये आरे कॉलनी, नॅशनल पार्क येथील विकास आराखडा, वनजमिनी, आदिवासींचे जातीचे दाखले, डीबीटी लागू करण्याबाबत तसेच कुपोषणावर चर्चा करून काही मागण्या येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्यावर तर काही मागण्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.आठ वर्षांनंतर रेकॉर्ड मोडले२०१० मध्ये श्रमजीवीने काढलेल्या मोर्चाचे रेकॉर्ड मंगळवारच्या मोर्चाने मोडीत निघाले. ५० ते ५५ हजार आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते, असा दावा पंडित यांनी केला.मुंबई पोलिसांमुळे दोन तास अंधारातविविध मागण्यांसाठी हजारो लोक मुलुंड येथे येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. पण, त्यांनी सुुरुवातीला साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नव्हती. तसेच लाइटची व्यवस्था न केल्याने दोन तास अंधारात काढावे लागले. या अव्यवस्थेमुळे आंदोलकांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यावर मुंबई पोलिसांनी तत्काळ व्यवस्था केली. त्या तुलनेत, ठाणे पोलिसांनी चांगली व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.पालघरला पालकमंत्री नाहीपालघर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा आदिवासीमंत्री काम करताना दिसत नाही. ते निष्क्रिय आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर प्रश्न सुटतील, असे वाटत नसल्याने सारखे मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते.निवडणूक लढवणार नाहीमी पूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत होतो. मात्र, मी भाजपासोबत नाही. निवडणुकीदरम्यान आपला शत्रू असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला होता. यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मोर्चादरम्यान एक महिला हरवलीमोर्चासाठी आलेली एक महिला मुलुंड येथील मैदानावरून अचानक बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेऊनही ती न सापडल्यावर नवघर पोलीस ठाण्यात त्या महिलेबाबत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे