शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८; अखेर ४५ तासांनी शोध मोहीम थांबवली

By नितीन पंडित | Updated: May 1, 2023 12:24 IST

इमारतीचा संपूर्ण ढिगारा उपसल्या नंतर तब्बल ४५ तासांनी बचाव पथकाने शोध मोहीम थांबविल्याचे भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले.

नितीन पंडितभिवंडी: वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड मध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली होती. रविवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा सहावर होता, सोमवारी सकाळी बचाव पथकाकडून शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर आणखीन दोन मृतदेह बजाव पथकाने ढिगाऱ्या खालून बाहेर काढली आहेत. अशोक मिश्रा वय २९ वर्ष व दिनेश तिवारी वय ३७ या दोघांचे मृतदेह सोमवारी सकाळी बचाव पथकाने बाहेर काढली आहेत.त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे.तर ढिगार्‍या खालून एकूण दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला आधीच यश आले आहे.         

इमारतीचा संपूर्ण ढिगारा उपसल्या नंतर तब्बल ४५ तासांनी बचाव पथकाने शोध मोहीम थांबविल्याचे भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले. येथे काम करणाऱ्या कामगारांचे व त्यांच्या नातेवाईकांकडून आता कोणीही ढिगाराखाली अडकले नसल्याची माहिती व तक्रार पोलीस व बचाव पाठकाकडे केली नसल्याने व संपूर्ण इमारतीचा ढिगारा उपसल्यानंतर ही शोध मोहीम थांबविली असून अजून जर कोणत्याही व्यक्तीबद्दल काही माहिती द्यायची झाल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी सानप यांनी नागरिकांना केले असून ही शोध मोहीम थांबविल्याचे जाहीर केले.         

बचाव पथकाने तब्बल ४५ तास अथक परिश्रम करून ही शोध मोहीम सुरूच ठेवून आठ मृतदेह तर दहा नागरिकांची सुटका केल्याने नागरिकांकडून एनडीआरएफ टीडीआरएफ अग्निशमन दल व बचाव पथकातील इतर कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मयातांची नावे- नवनाथ सावंत वय ३५ वर्षलक्ष्मी रवी महतो वय ३२ वर्षसोना मुकेश कोरी वय ४ वर्ष सुधाकर गवई वय ३४ वर्ष प्रमोद चौधरी वय २२ वर्ष त्रिवेणी यादव वय ४० वर्ष दिनेश तिवारी वय ३७ वर्ष अशोक मिश्रा वय २९ वर्ष 

जखमिंची नावे सोनाली परमेश्वर कांबळे वय २२ शिवकुमार परमेश्वर कांबळे वय अडीच वर्षेमुख्तार रोशन मंसुरी वय २६चींकु रवी महतो वर्ष ३ वर्षप्रिन्स रवी महतो वय ५ वर्षविकासकुमार मुकेश रावल वय १८ वर्षउदयभान मुनीराम यादव वय २९अनिता वय ३०उज्वला कांबळे वय ३०सुनील पिसाळ २५

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणे