शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नसल्याने डोलीतून नेताना आजारी वृद्धाचा मृत्यू; मुरबाडमधील साखरे सराईवाडीतील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 08:18 IST

नवसू सराई यांची अचानक प्रकृती बिघडली. रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत गाडी येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी डाेलीतून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.

- राजेश भांगे टाेकावडे : प्रगतीच्या गप्पा मारत असताना मुरबाड तालुक्यातील साखरे सराईवाडीतील नागरिक स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही रस्त्याअभावी वाटेतच जीव साेडत आहेत. मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी झाडेझुडुपे तुडवत काट्या-कुट्यातून एक किलाेमीटरपर्यंत कच्च्या पायवाटेवरून जावे लागत आहे. माेटारसायकल जाईल, एवढाही रस्ता नसल्यामुळे आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिलांना डाेलीतून न्यावे लागत आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नवसू धाकू सराई (वय ७०) यांना रुग्णालयात नेत असताना, त्यांचा रस्त्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 

नवसू सराई यांची अचानक प्रकृती बिघडली. रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत गाडी येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी डाेलीतून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. मुख्य रस्त्यावर पाेहाेचेपर्यंत वाटेतच नवसू यांचा मृत्यू झाला. रस्त्याअभावी रुग्णालयात वेळेत पाेहाेचू न शकल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आराेप नातेवाइक व ग्रामस्थांनी केला आहे. काॅम्प्युटर युगात जगत असताना गावाला रस्ता नसल्याने अद्याप अश्मयुगातच जगत आहाेत की काय, असा भास हाेत असल्याची खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. या गावात ३२ कुटुंबे राहत असून, त्यांना रस्ता आणि पाणी यांसारख्या मूलभूत समस्या भेडसावत आहेत.

स्थानिक प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. रस्ता नसल्यामुळे आमची तिसरी पिढी मरणयातना भोगत आहे. आमच्या नातेवाइकांचे रस्त्याअभावी जीव जाताना डाेळ्यांनी पाहावे लागत असल्याचे ग्रामस्थ अशाेक सराई यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी पार्वतीबाई महादू सराई व धर्मा पागो सराई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला हाेता. नवसू सराई हे तिसरे बळी ठरले, तसेच महादू सराई हे माेटारसायकलवरून पडून अपंग झाले हाेते, असे त्यांनी सांगितले.

साखरे सराईवाडीसाठी पूर्वी रस्ता हाेता. मात्र, ताे खासगी जागेतून जात असल्यामुळे फार्महाउस मालकाने ताे बंद केला आहे. त्याने ही जागा विकत घेतली आहे. हे प्रकरण तहसीलदारांकडे सुनावणीसाठी आहे. - ज्याेती गाेंधळी (भाेपी), ग्रामसेविका, साखरे ग्रामपंचायत. 

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे