शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : 'त्या' रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजनअभावी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:48 IST

प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू, चौकशी समितीचा अहवाल सादर

ठळक मुद्देप्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू, चौकशी समितीचा अहवाल सादरयापूर्वी नेमण्यात आली होती एक समिती

ठाणे : येथील वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांना केला होता. त्यानंतर  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल आता समोर आला असून त्या चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.वर्तक नगर भागातील वेदांत हॉस्पीटलमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. परंतु या चौघांचे मृत्यु ऑक्सीजन अभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करुन या प्रकरणाच सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया हे चौकशी समितीचे अध्यक्ष असून, शिवाजी पाटील (निवासी उपजिल्हाधिकारी), डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणो), संदीप माळवी (उपायुक्त - ठामपा), डॉ. वैजयंती देवगीकर (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा), मंदार महाजर (बायोमेडीकल इंजिनिअर - ठामपा) हे सदस्य म्हणून असणार आहेत. या समितीने सोमवारी सांयकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार येथे एकूण किती मृत्यू झाले, मृतांची नावे, वय, कोविड आजाराबाबत व रुग्णाच्या आरोग्य विषयक स्थितीची इतर आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. तसेच मृत्यू एकाच वेळेस झाला की वेगवेगळ्या वेळेत झाला याची माहितीही घेतली गेली.  मृत्यूंची कारणं आणि मृत्यूची वेळ या रुग्णांचा मृत्यु ऑक्सीजन पुरवठ्याशी काही संबंध आहे का?, याची देखील सविस्तर माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी ऑक्सीजनवर असलेल्या इतर रुग्णांशी देखील या समितीमधील सदस्यांनी चर्चा केल्याची माहिती देखील समोर येत आहे.त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यु झाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रत्येक रुग्णाचा मृत्यूची वेळ ही वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. त्यातही येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून ऑक्सीजन नसते तर त्यांना देखील याचा फटका बसला पाहिजे होता, परंतु तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सीजन अभावी झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.हलगर्जीपणा नाहीया रुग्णालयातील चार जणांचा मृत्यू हा ऑक्सीजन अभावी झालेला नाही, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय हलगर्जीपणा देखील झालेला नाही. ज्या रुग्णांचे मृत्यु झाले, त्यांची प्रकृत्ती खालावली असल्यानेच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु रुग्णालयाने ज्या ज्या वेळेत रुग्णांचे मृत्यू झाले होते, त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देणे अपेक्षित होते. तसे न केल्याने काहीसा गोंधळ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे यापुढे कोविड रुग्णालयांनी रुग्णाची प्रत्येक माहिती वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना देणो बंधनकारक करण्यात आले आहे.राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे 

टॅग्स :thaneठाणेOxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याtmcठाणे महापालिका