शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus News : वेळेवर उपचार न मिळाल्याने कल्याणमधील रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:31 IST

त्यांचा बराचसा वेळ वाया गेल्याने रुग्ण दगावला आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या आरेरावीचा फटका रुग्णांना बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण : शहरातील दोन रुग्णांपाठोपाठ आणखी एका रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खाजगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याने रुग्णाचे कुटुंबीय मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत उपचारासाठी वणवण फिरत होते. त्यात त्यांचा बराचसा वेळ वाया गेल्याने रुग्ण दगावला आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांच्या आरेरावीचा फटका रुग्णांना बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील गंगोत्री इमारतीमधील रहिवासी विनोद हजारे (६०) यांना १५ जूनच्या मध्यरात्री १२ वा. छातीत दुखू लागले. त्यांचा मुलगा सौरभ, त्यांच्या पत्नी व शेजाऱ्यांनी त्यांना लाल चौकी येथील खाजगी रुग्णालयात नेले. तेथे नर्सने विनोद यांचा रक्तदाब व आॅक्सिजनची पातळी तपासली. आॅक्सिजन कमी असल्याने त्यांना मीरा रुग्णालयात नेले. मात्र, त्यांना तेथे सुविधा नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उपासनीस यांच्या रुग्णालयात नेले असता तेथे बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी एजीएन रुग्णालयात नेले असता त्यांना दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. होलीक्रॉस रुग्णालयात नेले असता ते कोविड रुग्णालय असल्याने त्यांनी आत घेतले नाही. या सगळ्या प्रक्रियेत पहाटेचे ४ वाजले.अखेरीस केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी विनोद यांना इंजेक्शन देत आॅक्सिजनचा पुरवठा सुरू केला. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात अथवा जवळच्या खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगितले.त्यानुसार विनोद यांना मुलाने शहरातील आयुष रुग्णालय नेले असता तेथे आक्सिजनची सुविधा नसल्याने मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला गेला. सौरभने कशीबशी खाजगी रुग्णवाहिका मिळवून विनोद यांना मुंबईतील सरकारी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू केले असता विनोद यांचा मृत्यू झाला. वेळेत उपचार मिळाले असते तर विनोद बचावले असते, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.>‘शास्त्रीनगर’मध्ये बेडची वानवा डोंबिवली पूर्वेतील एका ५० वर्षांच्या महिलेचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिच्या मुलाने तिला शास्त्रीनगर कोविड रुग्णालयात नेले. तेव्हापासून शनिवार दुपारपर्यंत तिला बेड मिळाला नाही. त्यामुळे मुलाने आईला मानपाडा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. तर, आयुक्तांना मेसेज केले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.>या संदर्भात शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सुहासिनी बेडेकर म्हणाल्या की, शास्त्रीनगर रुग्णालयात सध्या ५९ रुग्ण उपचार घेत आहे. बेड उपलब्ध नसल्याने इतर ठिकाणी व्यवस्था करा, असे सांगितले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस