शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू; भाईंदरच्या पं. भीमसेन जोशी रुग्णालयातील प्रकार, चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:03 IST

दरम्यान या  प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

मीरारोड - भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात वेळीच उपचार न केले गेल्याने एकाचा झालेल्या मृत्युप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी संबंधितांचे जाबजबाब नोंदवले जात आहेत.सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी रुग्णालयात पाहणी साठी आले असता त्या महिलेस देखील आणण्यात आले होते. मीरारोडच्या पेणकरपाडय़ात राहणाऱ्या महिलेने सांगितले की, माझे 55 वर्षिय पतीला दोन दिवसा पासून बरे वाटत नव्हते. कोरोनाचा संशय असल्याने त्यांना शुक्रवारी रात्री रुग्णवाहिकेतून भाईंदरच्या टेंबा रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु शनिवारी सकाळी मी आले असता पती बाहेरच उघड्यावर आढळून आले. त्यांच्या चेहऱ्यावर मच्छर चावले होते व पावसात भिजले होते. तोंडातून फेस येत होता. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांनी मद्यपान केले असून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले. तेथून त्या रुग्णास घेऊन मीरारोडला खासगी रुग्णालयात गेल्या असता तेथे २ लाख अनामत रक्कम भरा असे सांगण्यात आले . त्यामुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. जोशी रुग्णालयातील कमर्चारी व डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला होता . प्रभाग समितीची स्वीकृत सदस्य सोमनाथ पवार यांनीच पालिका परिचारिकेस कळवून रुग्णवाहिका मागवली होती. त्यातूनच रुग्णास जोशी रुग्णालयात नेले होते. त्यांना दाखल करून घ्यायचे नव्हते तर त्याच्या पत्नीस वा मला कळवले असते तरी दुसरी कडे उपचारासाठी नेले असते व त्यांचा प्राण वाचला असता. आपण आयुक्तांना तक्रार केल्याचे पवार यांनी सांगितले . दरम्यान या  प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या नुसार जोशी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ . बाळासाहेब अरसुलकर यांनी चौकशी सुरु केली आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक