शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्लास्टर कोसळून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 05:15 IST

चार जण जखमी : भार्इंदरमधील २८ वर्षे जुनी इमारत

मीरा रोड : भार्इंदरमधील २८ वर्षे जुन्या इमारतीतील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर शुक्रवारी पहाटे कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. भार्इंदर पूर्वेच्या गोडदेवनाकयासमोरील एमआय उद्योग भागात साई पुष्पम नावाची तीन मजली इमारत आहे. यात ४४ सदनिका असून त्यातील तब्बल ३१ सदनिकांमध्ये भाडेकरू राहतात. ही इमारत २८ वर्षे जुनी असून बाहेरून ती व्यवस्थित दिसत असली, तरी आतील बांधकाम मात्र कमकुवत असल्याने जानेवारी महिन्यातच गृहनिर्माण संस्थेने सर्व सदनिकाधारकांना अंतर्गत दुरुस्ती करून घेण्याबद्दल लेखी पत्र दिले होते. काहींनी दुरुस्तीचे काम सुरू केले, तर बहुतांश रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सी ३०९ ही सदनिका मूळ मालक मनोज झिलका यांनी सुमारे वर्षभरापूर्वी खान कुटुंबीयांना भाड्याने दिली होती. परंतु, सदनिकेत मात्र अनेक जण राहत होते. शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास सर्व झोपेत असताना अचानक छताचे प्लास्टर कोसळले. यात मोहम्मद खालीब खान (४५), मुकीम खान (४०), मोहम्मद नफीस खान (३९), मोहम्मद हारूल खान (३०), आशिया बेगम (२८) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, नवघर पोलीस घटनास्थळी गेले.

जखमींना आधी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींपैकी मुकीम खान याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींनी इमारतीची पाहणी केली. पालिकेने तातडीने इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सुरू केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर इमारत रिकामी करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.घराच्या दुरुस्तीकडे केले दुर्लक्षगृहनिर्माण संस्थेचे सचिव शंकर गायकवाड म्हणाले की, या सदनिकामालकाने दीड वर्षापासूनचा सोसायटी मेंटेनन्स दिलेला नाही. तरीही, सर्वच सदनिकाधारकांना आधी अंतर्गत दुरुस्ती करून घ्या, म्हणून कळवले होते. तरीही, या मालकाने दुरुस्ती केली नाही, असे सांगितले.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाDeathमृत्यू