शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तींचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:45 IST

विमा कंपनीची फसवणूक; टोळीसह दोन डॉक्टरांना अटक, लाखो रुपये हडपले

कल्याण : जिवंत व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बनवून त्याआधारे विम्याच्या दाव्याची लाखो रुपये मिळवून तक्रारदारासह विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. उल्हासनगर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.चंद्रकांत शिंदे (रा. कल्याण), स्मशानभूमीत काम करणारा तेजपाल मेहरोल, डॉ. अब्दुल सिद्दिकी, डॉ. इम्रान सिद्दिकी, नारायण शिंदे आणि लक्ष्मी शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे, पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे यांच्यासह त्यांच्या पथकाने चंद्रकांत शिंदे (रा. चिंचपाडा) याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरुन ठाणे महापालिका, मुंब्रा विभागातील स्मशानभूमीत काम करणारा तेजपाल मेहरोल (रा. मुंब्रा) याने त्याच्या ओळखीतील डॉ. अब्दुल सिद्दिकी आणि डॉ. इम्रान सिद्दिकी यांच्याकडून दहा जिवंत व्यक्तींचे आणि आंध्र प्रदेश येथे मृत झालेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यू अहवालावर स्वाक्षरी करून त्याआधारे त्याने ठाणे महापालिका मुंब्रा आरोग्य विभाग येथून मृत्यूचे प्रमाणपत्र काढून शिंदे याला दिले. या खोट्या मृत्यूच्या प्रमाणपत्राद्वारे आरोपींनी विम्याच्या दाव्याचे ८१ लाख रुपये हडप केले.आरोपींनी जमवली प्रचंड मायापालिकेच्या मुंब्रा विभागातून बनावट मृत्यू दाखला तयार करून तक्रारदाराची सुमारे चार लाख, तर विमा कंपनीची सहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १५ जानेवारीला गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा तपास कल्याण गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान आरोपींची साखळी उघडकीस आली. आरोपींनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमवल्याचा पोलिसांचा दावा आहे.

टॅग्स :Deathमृत्यू