शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:03 IST

पालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार, शिदे गटात इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

जितेंद्र कालेकर

ठाणे-  निवडणुकीचे घाेडा मैदान आता जवळ आहे. त्यामुळे आगामी काळात ठिकऱ्या काेणाच्या उडतील, हे ठाण्यातली जनता दाखवून देईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उद्धवसेनेसह राज ठाकरेंना दिला. त्याशिवाय स्वत:च्या विचारांवर, भूमिकेवर जे ठाम राहत नाहीत, अशा लाेकांचा बॅंड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी राज यांच्यावर केली. काेपरीतील दिवाळी निमित्तच्या एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केला. ठाण्यातील काेपरी भागातील अष्टविनायक चाैक येथे शनिवारी दिवाळी पूर्व संध्या या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. याच कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका केली.  शिंदे म्हणाले की, ठिकऱ्या काेणाच्या उडतील, हे येणाऱ्या निवडणुकीतच ठाण्यातली जनता दाखवून देईल. आनंद दिघे यांचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांना कमी लेखले. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत आणि आनंद दिघे हे आमच्या रक्तात आहेत. ज्यांनी शिवसेना विकली, त्यांना जनता टिकली देईल अशी बाेचरी टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली.

उद्धवसेनेला धक्का

मुंबईतील उद्धवसेनेचे माजी नगरसेवक सगुण नाईक, लालू वर्मा, शाखाप्रमुख अक्षय राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी ठाण्यात शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी अहिल्यानगरचे प्रकाश चित्ते, प्रदेश सचिव रेश्मा जगताप तसेच देवळालीच्या पदाधिकाऱ्यांचेही शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde slams Raj Thackeray; Says people will teach them a lesson.

Web Summary : Eknath Shinde criticized Raj Thackeray, stating the public punishes those wavering from their principles. He asserted the Mahayuti will win upcoming elections, welcoming former Uddhav Sena members into his faction. Shinde accused Uddhav Thackeray of betraying Balasaheb's ideals.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना