शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 19:35 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह तीन आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह तीन आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख आणि इसरार जमीर अली सैयद यांना खंडणीच्या तीन गुन्ह्यांमध्ये खंडणी विरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली होती. कासकरच्या मोबाईल फोनचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) पोलिसांनी संबंधित कंपनीकडून मागविला होता. जवळपास वर्षभराचा हा सीडीआर असून, त्याद्वारे कासकरच्या नियमित संपर्कात असलेल्या काही संशयास्पद मोबाईल नंबर्सची पडताळणी तपास यंत्रणा करीत आहे. या व्यतिरिक्त कासकरने यापूर्वी आणखी काही सीम कार्डस्चा वापर केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्या सीम कार्डस्चे नंबर शोधून तपास करण्यासाठी पोलिसांनी कासकरसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कासकरच्या जुन्या सीम कार्डचे नंबर मिळाल्यास त्याआधारे आरोपींचे आणखी काही हस्तक आणि नियमित संपर्कातील व्यक्तींची नावे समोर येऊ शकतील, असा पोलिसांना विश्वास आहे. जागेच्या वादातून आरोपींनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून 40 तोळे सोने खंडणीच्या स्वरूपात बळकावले होते. त्यापैकी जवळपास निम्मे सोने पोलिसांनी वसूल केले. उर्वरित सोने वसूल करण्यासाठी आरोपींची चौकशी करण्याची गरज असल्याचा मुद्दाही पोलिसांनी न्यायालयासमोर मांडला. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरून तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबर्पयत वाढविली. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय