शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डॉनचा झाला बडे, छोटा शकील म्हणजे पाव टकला; गुन्हेगारी जगतातील सांकेतिक भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:37 IST

आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतामध्ये वापरल्या जाणा-या सांकेतिक भाषेचा गौप्यस्फोट ठाणे पोलिसांनी केला आहे.

- राजू ओढे ।ठाणे : आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतामध्ये वापरल्या जाणा-या सांकेतिक भाषेचा गौप्यस्फोट ठाणे पोलिसांनी केला आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून या काळ्या दुनियेमध्ये दाऊद इब्राहिमचा उल्लेख बडे म्हणून तर छोटा शकीलचा पाव टकल्या म्हणून केला जातो.पोलिसांसह भारतातील इतर सुरक्षा यंत्रणा आणि इंटरपोल कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हालचालींवर नजर ठेऊन आहे. त्यांच्यापासून वाचण्यासाठी दाऊदने कराचीतील बंगल्यामध्ये अत्याधुनिक साधनांसह तंत्रज्ञांची फौज तैनात आहे. दाऊद किंवा छोटा शकील त्यांच्या हस्तकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्यत्वे व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) तंत्रज्ञानाचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे कॉल कुठून आला आहे, हे स्पष्ट होत नाही. इत:पर सुरक्षा यंत्रणा या कॉल्सवर लक्ष ठेऊन असतात. कोणत्याही कॉलमध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, पैसा, शस्त्र किंवा खुनासारख्या कोणत्याही शब्दांचा वापर झाला की यंत्रणेचे कान टवकारले जातात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतामध्ये यासाठी सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. या दुनियेत दाऊद इब्राहिमला बडे, तर छोटा शकीलला पाव टकल्या म्हणतात.खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या तिघांना १९ सप्टेंबर रोजी अटक केली. चौकशीदरम्यान त्यांच्या कार्यपद्धतीपासून इतर इत्थंभूत माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. एखाद्या व्यापाºयाकडून खंडणी वसूल करताना पोलिसांपासून वाचण्यासाठी कोण-कोणती खबरदारी घेतली जाते, याची माहितीही पोलिसांनी आरोपींकडून घेतली. या चौकशीदरम्यान आरोपींनी अंडरवर्ल्ड जगतामध्ये वापरल्या जाणाºया सांकेतिक भाषेची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, या काळ्या धंद्यात गुंतलेली मंडळी एकमेकांशी फोनवर संपर्क साधताना पुरेशी खबरदारी घेतात. बडे से बात हो गई, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले की, त्याचे दाऊद इब्राहिमशी बोलणे झाल्याचे पलीकडची व्यक्ती समजून घेते. त्यांचे संभाषण मुख्यत्वे हिंदी भाषेतच असते.धक्का दे के आगे बढो...टोळीने हेरलेले सावज खंडणी देण्यास तयार होत नसेल तर आधी ‘हाथ लगाव’ अशा सूचना हस्तकांना दिल्या जातात. हाथ लगाव याचा अर्थ त्या सावजाला पुरते घाबरवून सोडा असा होतो. तेवढ्याने काम होत नसेल तर ‘धक्का दे के आगे बढो’ असा आदेश दिला जातो. याचा अर्थ त्या सावजाचा खून करा आणि दुसरे बघा, असा होतो.

टॅग्स :Crimeगुन्हा