सफाई कामगार महिलेचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:25 AM2018-07-16T06:25:53+5:302018-07-16T06:26:03+5:30

महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार असणाऱ्या मीना मारुती चौगुले (४७) या महिलेला डेंग्यूची लागण झाल्याने रविवारी सकाळी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Dangerous death of a clean worker woman | सफाई कामगार महिलेचा डेंग्यूने मृत्यू

सफाई कामगार महिलेचा डेंग्यूने मृत्यू

googlenewsNext

भार्इंदर : येथील महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार असणाऱ्या मीना मारुती चौगुले (४७) या महिलेला डेंग्यूची लागण झाल्याने रविवारी सकाळी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे अतिदक्षता विभाग नसल्याने रुग्णाला योग्य उपचार मिळाले नाहीत. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
गेल्या १२ वर्षांपासून त्या पालिकेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांनी साचलेल्या पाण्यात काम केल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती.

Web Title: Dangerous death of a clean worker woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.