शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील धोकादायक इमारती : हजारो रहिवासी सोशल मीडियामुळे दहशतीखाली- कुमार बडदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:50 IST

मुंब्य्रातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या या मेसेजेचा फटका मुंब्य्रातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांना बसला आहे.

मुंब्रा : मुंब्य्रातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या या मेसेजेचा फटका मुंब्य्रातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांना बसला आहे. त्यामुळे हे रहिवासी दोन दिवसांपासून दहशतीखाली वावरत आहेत.अशा १४६० इमारतींची यादी सध्या फिरते आहे. पालिकेने मात्र फक्त दहा इमारती तोडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिकेने नुकतीच विविध प्रभाग समितीअंतर्गत धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित केली. त्यात मुंब्य्रातील १४६० इमारतींचा समावेश आहे. कोणत्या श्रेणीत किती इमारती आहेत, किती इमारती त्वरित तोडण्याची आवश्यकता आहे, किती इमारती दुरूस्त होऊ शकतात, याची कोणत्याही प्रकारची खातरजामा न करता यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून, यामुळे ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार आहेत, अशा आशयाचा मेसेज काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. या मेसेजमुळे ज्या इमारतींची नावे धोकादायक इमारतींच्या यादीत आहेत, त्या बहुतांशी सर्वच इमारतींमधील रहिवासी मानसिक तणावाखाली वावरत आहेत. दरम्यान, मुंब्य्रातील अतिधोकादायक अशा केवळ १० इमारती या पावसाळ्यापूर्वी तोडण्यात येणार आहेत. यामुळे दुरूस्त होऊ शकणाºया सी २ ए (इमारत रिकामी करु न तिची दुरूस्ती करणे), सी २ बी (रहिवाशांनी वास्तव्य करतानाच ती दुरूस्त करणे) आदी गोष्टींची माहिती घ्यावी.कार्यवाहीचे काही निकषज्या इमारतींचा समावेश या यादीत होतो, त्यावरील कार्यवाहीची एक पद्धत असते. त्याचेही काही निकष असतात. त्यामुळे रहिवाशांनी घाबरून जाऊ नये.या इमारतींमधील रहिवाशांनी कोणत्याही प्रकारचा ताण न घेता घाबरु न न जाता, त्या इमारतींच्या श्रेणीनुसार दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे.ठाणे महापालिकेने घोषित केलेल्या मुंब्य्रातील १,४६० इमारतींपैकी अतिधोकादायक अशा फक्त १० इमारती पावसाळ्यापूर्वी तोडण्यात येणार आहेत. त्यातील सात इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.- झुंजार परदेशी, सहाय्यक आयुक्त,मुंब्रा प्रभाग समिती.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाnewsबातम्या