शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
6
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
7
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
8
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
9
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
10
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
11
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
12
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
13
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
14
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
15
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
16
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
17
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
18
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
19
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
20
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्र-४ ची इमारत धोकादायक, कार्यालय हलविले पालिका शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:25 IST

Ulhasnagar News: उल्हासनगरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर असतांना, नेताजी चौकातील प्रभाग समिती क्रं-४ च्या कार्यालयाच्या इमारतीचा खांब खचल्याने धोकादायक झाली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : नेताजी चौकातील महापालिका प्रभाग समिती क्र-४ ची इमारत धोकादायक झाल्याने, प्रभाग समिती व अग्निशमन दलाचे कार्यालय इतरत्र हलविण्याची वेळ महापालिकेवर आली. धोकादायक घोषित केलेल्या इमारती दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करून इमारतीत प्रभाग समिती कार्यालय थाटण्यात आले होते. (Ulhasnagar Municipal Corporation)

उल्हासनगरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर असतांना, नेताजी चौकातील प्रभाग समिती क्रं-४ च्या कार्यालयाच्या इमारतीचा खांब खचल्याने धोकादायक झाली. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत खाली करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून प्रभाग समिती क्रं-४ चे कार्यालय महापालिका शाळा क्रं-१९ मध्ये हलविण्यात येत आहे. तसेच इमारती मधील अग्निशमन दलाचे कार्यालय व गाड्या नेताजी चौकातील जुन्या प्रभाग समिती कार्यालयात हलविण्यात आल्या. याप्रकारने शहरातील अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला. प्रभाग समिती कार्यालय असलेली इमारत यापूर्वीच महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती. मात्र स्थानिक राजकीय नेत्यांच्या हट्टाहासा पोटी तत्कालीन आयुक्तांनी इमारतीवर कोट्यवधींचा खर्च करून ८ वर्षांपूर्वी दुरुस्ती केली होती.

 नेताजी चौकातील प्रभाग समिती क्रं-४ चे कार्यालय धोकादायक इमारतीमुळे शाळा क्रं-१९ मध्ये हलविण्याची वेळ महापालिकेवर आली. त्या पाठोपाठ व्हीटीसी मैदान संकुलातील क्रीडा संकुल इमारती मध्ये असलेले प्रभाग समिती क्रं-३ चे कार्यालय इतरत्र हलविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली. प्रभाग समिती कार्यालय जागी भव्य क्रीडा संकुल उभे राहणार आहे. पुढील महिन्यात क्रीडा संकुलाचे काम सुरू होण्याचे संकेत महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. एकूणच धोकादायक इमारतीचा फटका अप्रत्यक्ष महापालिकेला बसल्याची चर्चा शहरात आहे. एकीकडे धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना अवैध बांधकामकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. 

महापालिका मुख्यालय इमारतींचा चर्चा रंगली महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारतीच्या पाश्वभूमीवर १० वर्ष जुन्या इमारतींना सरसगट १५०० पेक्षा जास्त इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या. तर दुसरीकडे महापालिका मुख्यालय इमारतीला गळती लागली असून गळती लागलेल्या मुख्यालय इमारती मधील विविध कार्यालय दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असून इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहार।

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे