शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:54 IST

संसार आला रस्त्यावर । १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

भिवंडी: भिवंडीत मागील आठवड्यात बेकायदा इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच शुक्र वारी सायंकाळी पुन्हा एकदा गैबीनगर येथे ४२ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीस तडे गेल्याने तब्बल १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवून इमारत पालिकेने रिकामी केली.

शांतीनगर भागातील गैबीनगर येथील फैजूल उलम मदरसा ट्रस्टच्या मालकीच्या मशिदीची सुन्नी जामा मशीद, चाळ घरक्र मांक ७९२ ही तब्बल ४२ वर्षे जुनी दोन मजली इमारत आहे. ही इमारत पालिका प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये धोकादायक ठरवली होती. त्याचबरोबर या इमारतीची वीज व पाणीजोडणीही कापली होती. मात्र, या इमारतीवर कारवाई करण्यास नागरिकांनी तेव्हा विरोध करत आपण स्वत: ही इमारत पाडण्याचे आश्वासन येथील भाडोत्रींनी दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही हे भाडोत्री याच इमारतीत तळ ठोकून बसले होते.शुक्र वारी दुपारी अचानक धोकादायक असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने मशिदीमधून ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना इमारत रिकामी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या आदेशानुसार पोलीस व कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील १८ खोल्यांमधील ४२ वर्षांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्य करणाºया कुटुंबीयांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या पथकाच्या मदतीने घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगून इमारत रिकामी करण्यास सांगितली.इमारतीचा वीजपुरवठा व नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर इमारतीतील भाडोत्रींनी गरजेच्या वस्तू हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेत तब्बल १८ कुटुंबे बेघर झाली असून तीन वर्षांपासून इमारतमालक, ट्रस्टी व भाडोत्री यांच्यात जागेचा ताबा सोडण्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळत असून इमारत पाडल्यानंतर नवी इमारत उभी करून घर परत मिळेल का, या विवंचनेत या इमारतीतील रहिवासी आहेत. तब्बल ४२ वर्षे या इमारतीमध्ये राहिल्यानंतर अचानक इमारत सोडून जायचे कुठे, असा सवाल या इमारतीमधील नागरिक विचारत आहेत.तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावितदरम्यान, या इमारतीवर तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावित असून याबाबत इमारतमालकांवर गुन्हाही दाखल झालेला असल्याची माहितीही मिळत आहे. इमारत दुर्घटना व त्यामुळे होणारी हानी टाळावी, यासाठी भविष्यातील धोका ओळखून इमारत रिकामी करून वापर थांबवला आहे, अशी प्रतिक्रि या आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी दिली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे