शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घाणीच्या साम्राज्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 22:40 IST

साठलेल्या कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरांतील सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे स्वच्छता अधिका-यांनी व स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे.

भिवंडी : शहरातील नवीवस्ती येथील गौतम कंपाऊण्डमध्ये साठलेल्या कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरांतील सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे पालिकेच्या स्वच्छता अधिका-यांनी व स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे.पालिकेच्या प्रभाग समिती क्र .३ मधील प्रभाग क्र.१५च्या कार्यक्षेत्रातील कल्याणरोड येथील गौतम कंपाऊण्ड,बिहारी चाळ या भागात ग्लोरी हायस्कुल(इंग्रजी),सरस्वती हायस्कुल,पालिकेच्या शाळा क्र.६८(उर्दु),शाळा क्र.६०,५७ व ६७(मराठी,तामीळ व तेलुगू)अशा सहा शाळा असुन परिसरांतील हजारो विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत.तसेच या भागात सुमारे वीस-पंचवीस हजाराची कामगार वस्ती आहे.असे असताना या भागातील अस्वच्छतेने कहर केला आहे.या भागातील नाले व गटारे वर्षानुवर्षे साफ न केल्याने घाणीने भरलेले आहेत. त्याच प्रमाणे शाळेत जाण्यासाठी असलेला रहदारीचा रस्ता गेल्या काही वर्षापासून न बनविल्या मुळे नादुरूस्त रस्त्यावरून विद्यार्थ्यांना व नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.या भागात कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्या पसरले आहे.तसेच जंतूनाशक औषधांची फवारणी केली जात नाही.तसेच या भागातील भिशीत(खाणावळ)यंत्रमाग कामगारांना नाईलाजाने जेवण करावे लागत आहे.अस्वच्छतेमुळे परसरलेल्या रोगराईने त्रस्त नागरिक अक्षरश: नरकयातना भोगत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तर नगरसेवकांकडे तक्रार करूनही त्यांनी पाठ फिरवली आहे.त्यामुळे पालिका आयुक्त योगेश म्हसे आणि उपायुक्त (स्वच्छता)विनोद शिंगटे यांनी या भागाची पहाणी करून ही समस्या दूर करावी,अशी मागणी पारसिरांतील नागरिकांनी लेखी पत्राव्दारे केली आहे. (प्रतिनीधी)(सोबत फोटो आहे.)-------------------------------------------------------चौकट-गेल्या पाच वर्षापासून या भागातील रस्ते व गटारे दुरूस्त केल्याची नोंद पालिकेत आहे.मात्र प्रत्यक्षात या परिसरांत कोणतेच काम झालेले माही,अशी माहिती माजी नगरसेवक नासीर सय्यद यांनी दिली.--------------------------------------------------

टॅग्स :Schoolशाळाbhiwandiभिवंडी