शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन वाहनांसह दुकानांचेही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 00:52 IST

घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन वाहनांसह दोन दुकानांना या कंटेनरची जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देघोडबंदर रोडवरील घटनाचालकाचे पलायन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन वाहनांसह दोन दुकानांना या कंटेनरची जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चालकाने मात्र कंटेनर सोडून तिथून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.जेएनपीटी येथे माल उतरविल्यानंतर पुन्हा ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रोडने रविवारी सकाळी जाणारा हा रिलायबेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या कंपनीचा कंटेनर ओवळा नाका येथे आला असता, चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. यात दोन झाडे, रियाज यांच्या न्यू गरीब नवाज कॅटरर्स आणि नदीम यांच्या ड्रीम मेन्स सलून या दोन दुकानांनाही तो धडकला. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या हार्मोनी रेसिडेन्सी येथील आशिष मिस्त्री आणि कृष्णा साळुंके यांच्या दोन मोटार कारलाही या कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन्ही दुकानांसह दोन्ही मोटारकारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मदतकार्य राबविले.* या घटनेनंतर काही नागरिकांनी या कंटेनर चालकाला मारहाण केली. त्यानंतर तो तिथून पसार झाला. त्याचा कंटेनर मात्र पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एरव्ही, ओवळा नाका येथे मोठी वर्दळ असते. हा अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात