शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

दाल खिचडी मॅडम! गरोदर महिलेला पहाटे लागलेली भूक, सिव्हील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:37 IST

Thane news: महिला वॉर्डमध्ये जेवणाच्या थाळी बद्दल विचारणा केली त्यावेळी काही नव्हते. मग रुग्णालयाच्या किचन मध्ये चौकशी केली. तर तेथेही काही नसल्याचे समोर आले. मग सुरु झाला पहाटे उघड्या असणाऱ्या हॉटेल्सचा शोध.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : शासकीय रुग्णालय म्हटले तर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु कोरोनाच्या काळात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोरोना रुग्णांसह इतरांसाठी तारणहार ठरल्याचे अनेक उदाहरणो समोर आली आहेत. त्यातील एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.  पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नऊ महिन्यांची गरोदर महिला कोरोना पॉझटिव्ह असल्याने रु ग्णालयात उपचारार्थ दाखल झाली. मात्र, मातृत्वापुढे कोरोनाचे संकट तिला किरकोळ वाटले. परंतु सायंकाळपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने त्या महिला अन्नासाठी काकुळती झाली होती. तिच्या मनाता कोपरा येथील डॉक्टर पुष्कराज रसाळ यांनी हेरला. त्यानंतर रुग्णालयाच्या किचनपासून ते बाहेर कुठे काही खाण्यासाठी मिळते का? याची धावाधाव सुरु झाली आणि अखेर पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास डिलिव्हरी बॉय दाल-खिचडी घेऊन आला आणि त्या मातेची भुक भागली.

बदलापूर येथील रिया नामक ( नाव बदलेले  आहे) महिला नऊ महिन्यांची गरोदर असल्याने त्यांच्या पायाला सूज आली होती. या आलेल्या सुजीमुळे त्यांना नीट उभे किंवा चालता ही येत नसल्याने त्याच्या शेजारी राहणा:यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांना बदलापूर येथील स्थानिक रु ग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना ठाणो, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खासगी वाहनांनी शेजा:यांच्या मदतीने ३८ किलो मीटर प्रवास करून त्या कळवा रु ग्णालयात आल्या. यावेळी त्यांची सुरवातीला कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल रात्नी उशिरा आला. त्यामध्ये त्या पॉझटिव्ह असल्याचे समोर आल्यावर त्यांना तातडीने ठाणो जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रु ग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार, त्या महिलेला घेऊन तिचे नातेवाईक आणि शेजारी साधारण पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास रु ग्णालयात रु ग्णवाहिकेने दाखल झाले. त्यावेळी कर्तव्यावर डॉ पुष्कराज रसाळ होते. त्यांनी कोणताही विलंब न करता, त्या महिलेला उपचारासाठी भरती करून घेत उपचार सुरू केले. याचदरम्यान डॉ. रसाळ यांना त्यांच्या चेह:यावरील व्याकुळपणा आणि अंगातील अशक्तपणा जाणवला आणि त्यांनी तुम्ही काही खाले आहे का? नाही असा सवाल केला. त्यावर त्या माऊलीने काही खाल्ले नसल्याचे सांगितले.

डॉ.रसाळ यांनी त्या महिला वॉर्डमध्ये जेवणाच्या थाळी बद्दल विचारणा केली त्यावेळी काही नव्हते. मग रुग्णालयाच्या किचन मध्ये चौकशी केली. तर तेथेही काही नसल्याचे समोर आले. त्याचवेळेस परिचारिका सायली मोरे यांनी नेत्नालय इमारतीमधून एक बिस्कीटचा पुडा आणला. पण, पुड्याने पोट भरणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी रुग्णालयाच्या परिसरातील रात्री उघड्या असणा:या हॉटेल्सचे नंबर जस्ट डायल कडून घेतले. सुरु वातीला कोणी फोन उचलत नव्हते. ८ ते १० नंबर लावल्यानंतर दोघा-तिघांनी फोन उचलले. परंतु तेथे पिझ्झा व्यतिरिक्त काही नव्हते. हे पदार्थ महिलेच्या पायाला आलेल्या सुजेच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यातच आणखी एका नंबर डायल केल्यावर येथे दाल खिचडी मिळेल असे समोरून सांगण्यात आले. त्यानुसार ऑर्डर दिली. त्यानंतर जवळपास सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास चेतन नामक डिलिव्हरी बॉय दाल खिचडी घेऊन आला. त्याला पैसे देत डॉक्टरांनी तातडीने ती दाल खिचडी त्या महिलेला खाऊ घातली. अशाप्रकारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा चांगुलपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

 ती महिला अशक्त असल्याचे पाहून सहज विचारले. त्यानंतर तिने काहीच खाले नसल्याचे समजले. त्यानंतर तिचा पोटात असलेल्या बाळासाठी तिच्या पोटात अन्नाचे कण जाणो महत्वाचे असल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला दाल खिचडी उपलब्ध करुन दिली. तिच्यासह तिच्या बाळाला काही न होणो हाच या मागचा उद्देश होता.- डॉ. पुष्कराज रसाळ, जिल्हा शासकीय रु ग्णालय ठाणे

टॅग्स :thaneठाणे