शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या राज्य वीमा कामगार रुग्णालय वसाहतीत महिलांच्या आंदोलनामुळे होणार डागडूजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 21:50 IST

राज्य वीमा कामगार रुग्णालय कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने महिलांच्या आंदोलनाची दखल घेत याठिकाणी डागडूजी करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देइमारती धोकादायक अवस्थेतस्वच्छतागृहांची ड्रेनेजलाईन तुंबलेलीपथदिव्यांच्या अभावामुळे अंधाराचे साम्राज्य

ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आवारातील रुग्णालयीन कर्मचा-यांच्या वसाहतीच्या दुरवस्थेविरुद्ध महिलांनी बुधवारी आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या आंदोलनाच्या अवघ्या काही तासांमध्येच प्रशासनाने वसाहतीची डागडुजी करण्याचे मान्य केल्याने महिलांनी हे उपोषण मागे घेतले.राज्य कामगार विमा योजना रुग्णालय कर्मचा-यांच्या वसाहतीमध्ये वीजेचा नेहमीच लपंडाव असतो. इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहांची ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे. त्यामुळे टाक्या वाहून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वसाहतीमध्ये जागोजागी कच-यांचे ढीग पसरले आहे. ते साफ करण्यासाठी कोणीही सफाई कामगार नसल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. वसाहतीमधील कंपाऊंड आणि रस्त्यावर पथदिवेही नाहीत. अंधारामुळे रात्रीच्या वेळी महिला आणि मुलांना जाणे येणेही जिकरीचे होते. या सर्वच दुरवस्थेबद्दल राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रणित राज्यस्तरीय शासकीय महिला कर्मचारी व शासकीय कुटूंब महिला मंचाने विमा रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संघटनेच्या अधक्षा सुवर्णा शेवाळे, कार्याध्यक्षा जनाबाई साळवे आणि शांता वाघाळे आदी ६० ते ७० महिलांनी बुधवारी सकाळी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उपोषण केले. या उपोषणाची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाचे उपायुक्त संजीव कुमार यांनी कर्मचारी संघटना आणि महिलांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे लेखी आश्वासन दिले. येत्या काही दिवसांमध्ये येथील इमारतींची डागडुजी केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आल्याचे मुंबई जिल्हा चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष गजानन म्हामुणकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य